करोना विषाणूची लागण झालेल्या देशभरातील रुग्णांची संख्या १००४ झाली आहे. आतापर्यंत यापैकी २४ जणांचा मृत्यू ओढवला आहे. यापैकी ८३३ रुग्णांवर सध्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत, तर ७९ रुग्ण हे पूर्णत: बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. दिवसेंदिवस करोनाचा भारतातील प्रदुर्भाव वाढतच आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. या महामारीवर सध्या तरी कोणताच उपाचार नाही. पण ही माहामारी पसरू नये म्हणून केंद्र सरकारकडून योग्य ते उपाय केले जात आहेत.

करोनाची साखळी तोडण्यासाठी भारतामध्ये लॉकडाउनही घेण्यात आला आहे. वैज्ञानिक आणि तज्ञ्ज या महामारीवर उपाचार शोधत आहे. केंद्र सरकारने एक स्पर्धा घेत नागरिकांनाही यात सामिल होण्याचं आव्हान केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत यामध्ये देशातील नागरिकांनी सहभागी होण्याचे अवाहन केलं आहे.

https://innovate.mygov.in/covid19/ या संकेतस्थळावर COVID 19 Solution Challenge हे चॅलेंज केंद्रानं लाँचं केले आहे. घरबसल्या करोनाशी लढण्याची संकल्पना द्या आणि मोठं बक्षीस जिंका. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्यांना एक लाखांचं बक्षीस देण्यात येणार आहे. दुसऱ्या संकल्पनेसाठी ५० हजार तर तिसऱ्या संकल्पनेसाठी २५ हजारांचा इनाम देण्यात येणार आहे. १६ मार्च रोजी सुरू झालेलं हे चॅलेंज ३१ मार्च पर्यंत आहे.