Baba Swami Chaitanyananda Dirty Chats Leaked: दिल्लीमधील स्वयंघोषित बाबा स्वामी चैतन्यानंद सरस्वती याला अनेक विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. चैतन्यानंद सरस्वतीच्या चौकशीत रोज नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. एका विद्यार्थिनीला रात्री अपरात्री व्हॉट्सॲपवर नको ते संदेश पाठवून चैतन्यानंद सरस्वती त्यांचे लैंगिक शोषण करत होता, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर येत आहे.
न्यूज१८ ने दिलेल्या बातमीनुसार, चैतन्यानंद सरस्वती विद्यार्थिनीला मेसेजवर ‘बेबी’ असे म्हणतो. ‘आज रात्री माझ्या खोलीत झोपण्यासाठी ये’, असेही तो सदर विद्यार्थीनीला सांगतो. त्याचे ऐकले तर तो विद्यार्थीनींना विदेश दौरे घडवून आणेन असेही आमिष दाखवतो, तसेच त्याचे म्हणणे ऐकले नाही तर परीक्षेत नापास करण्याची धमकीही देतो.
चैतन्यानंद सरस्वतीचे चॅट मिळवण्याचा प्रयत्न तंत्रज्ञ करत आहेत. आतापर्यंत सहा चॅट मिळवले असून त्यात त्याच्या अश्लिल चाळ्यांची माहिती समोर आली आहे. एका चॅटमध्ये मात्र सर्वात मोठा धक्कादायक खुलासा समोर आलेला आहे. यात ‘दुबईचा शेख’ आणि ‘सेक्स पार्टनर’ असे दोन उल्लेख आढळतात.
व्हॉट्सॲपमध्ये नेमके काय लिहिले होते?
बाबा : दुबईच्या एका शेखला सेक्स पार्टनर हवा आहे, तुझ्या ओळखीत चांगली मुलगी आहे का?
पीडित : कुणीही नाही
बाबा : हे कसे शक्य आहे?
पीडित : मला कल्पना नाही
बाबा : तुझी वर्गमैत्रीण किंवा एखादी ज्युनिअर?
पीडित : मी आता झोपायला जात आहे, उद्या फोन करते.
बाबा : तू माझ्या खोलीत झोपणार नाहीस?
पीडित : गुड नाईट
न्यूज १८ ने सूत्रांच्या हवाल्याने वरील चॅट समोर आणले आहे. याशिवाय तपास यंत्रणांकडे आणखीही काही मेसेजेस आहेत. त्यात बाबा विद्यार्थिनींकडे अश्लील मागणी करत असल्याचे कळते.
दिल्लीमधील स्वयंघोषित बाबा स्वामी चैतन्यानंद सरस्वतीच्या विरोधात आश्रमातील १७ विद्यार्थिनींनी गैरवर्तन केल्याचे आरोप केले आहेत. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, अटक वॉरंट निघताच स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार झाला. दोन दिवसांनी पोलिसांनी त्याला अटक केली.
आरोपी बाबा दिल्लीतील ‘श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट’ या खासगी संस्थेचा संचालक आहे. मोबाईलवर अश्लील मजकूर पाठवणे, अपमानास्पद भाषा वापरणे आणि बळजबरीने शारीरिक स्पर्श करणे यांसारख्या आरोपांचा विद्यार्थीनींच्या तक्रारीत समावेश आहे.
कोण आहेत चैतन्यानंद सरस्वती?
स्वामी चैतन्यानंद सरस्वती याचे खरे नाव डॉ. पार्थसारथी असून, तो मूळचा ओडिशातील रहिवासी आहेत. स्वत:ला धर्मगुरू म्हणणारा हा स्वयंघोषित बाबा १२ वर्षांपासून श्री शृंगेरी मठाद्वारे चालविल्या जाणाऱ्या आश्रमात राहत होता. दिल्लीतील वसंत कुंज परिसरात असलेल्या ‘श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट’ या खासगी संस्थेचा तो संचालक असल्याची माहिती समोर आली आहे.
चैतन्यानंद याचा भूतकाळ वादग्रस्त राहिलेला आहे. २००९ मध्ये त्याने दिल्लीतील एका महिलेचा विनयभंग केला होता. त्यावेळी पोलिसांनी चैतन्यानंद याला अटक करून त्याची तुरुंगात रवानगी केली होती. २०१६ मध्ये वसंत कुंज परिसरात एका महिलेने त्याच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती. तेव्हाही पोलिसांनी त्याला अटक केली होती.