जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर ४४ अब्ज डॉलर्समध्ये (३ लाख ३७ हजार कोटी रुपयांहून अधिक) खरेदी केली आहे. हा करार या वर्षी पूर्ण होईल. हा करार पूर्ण होताच इलॉन मस्क यांचे ट्विटरवर पूर्ण नियंत्रण असेल आणि ट्विटर ही खासगी कंपनी बनेल. मात्र असं असताना ट्विटरवर ट्विटरच्या विरोधात ट्रेंड दिसू लागला. इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेताच अति डाव्या विचारसरणीच्या लोकांनी ट्विटरवर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. अमेरिकन व्यंगचित्रकार पॅट ब्रॅगले यांनी लिहिले की, “इलॉन मस्क ट्विटरला मुक्तपणे लिहिण्याची परवानगी देतील, परंतु ते उजव्यांसाठी विषारी नाले बनवणार आहेत. यावर इलॉन मस्क यांनी अति डाव्या विचारसणीच्या लोकांना फटकारलं आणि राजकीय विचारांची झलक दाखवून दिली. इलॉन मस्क यांनी सांगितलं की, “ट्विटरवरील प्रत्येकाला आपलं मत मांडण्याची संधी मिळेल. कट्टर विरोधक असलं तरी”. इलॉन मस्क यांच्या या ट्विटनंतर एक खास विचारांनी प्रेरीत ट्विटर युजर्संना संताप अनावर झाला. त्यानंतर #LeavingTwitter हा ट्रेंड सुरु झाला. दुसरीकडे, विरोधी विचार असलेल्या लोकांनी #FreeSpeech सह मस्कच्या विधानाचे समर्थन करण्यास सुरुवात केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“अति डावे लोक सर्वांचा तिरस्कार करतात. त्यात त्यांचाही समावेश आहे!”, असं इलॉन मस्क यांनी ट्विट केलं. त्यानंतर १६ मिनिटांनंतर त्यांनी अति उजव्या विचारणीबाबतही आपलं मत स्पष्ट केलं. “पण मी अगदी अति उजव्यांचाही चाहता नाही. द्वेष कमी आणि प्रेम जास्त करू या.”, असं ट्वीट इलॉन मस्क यांनी त्यानंतर केलं.

डेमोक्रॅटिक प्क्षाबाबतही इलॉन मस्क यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “मी ओबामा यांना अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला होता. पंरतु आजच्या डेमोक्रॅटिक पक्षाचं जहाल मतवादी लोकांनी अपहरण केलं आहे.” इतकेच नाही तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तयार केलेल्या ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे उदाहरण देत इलॉन मस्क यांनी ट्विटरच्या धोरणावरही निशाणा साधला. इलॉन मस्कने लिहिले की ट्रुथ सोशल केवळ अस्तित्त्वात आहे कारण ट्विटरने मुक्त विचार सेन्सॉर केले.

ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी हे डाव्या विचारसरणीचे समर्थक आहेत. परंतु, ट्विटरच्या धोरणांबद्दल जॅक डोर्सी नेहमी दावा करत होते की, त्यांच्या डाव्या विचारसरणीचा कंपनीवर आणि तिच्या धोरणावर कोणताही परिणाम होत नाही. परंतु, गेल्या काही वर्षांत, ट्विटर त्याच्या धोरणांमुळे उजव्या विचारसरणीच्या लोकांना लक्ष्य करण्याच्या कृतींमुळे तीव्र टीका होत आहे. ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्या’च्या नावाखाली डाव्या विचारांचा प्रचार केल्याचा आरोप ट्विटरवर करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Far left hates everyone says twitter elon musk rmt