अविभाजित आंध्र प्रदेशचे अखेरचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी आज ( ७ एप्रिल ) भाजपात प्रवेश केला आहे. अलीकडेच किरण कुमार रेड्डी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. रेड्डी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहित राजीनामा दिला होता. त्यानंतर आज रेड्डींनी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किरण कुमार रेड्डींनी यापूर्वीही काँग्रेसचा राजीनामा दिला होता. २०१४ साली तत्कालीन यूपीए सरकारने आंध्र प्रदेशपासून काही जिल्हे वेगळे करत तेलंगणा या नव्या राज्याची स्थापना केली होती. याच्या विरोधात किरण कुमार रेड्डींनी राजीनामा दिला होता. नंतर रेड्डी यांनी स्वत:चा ‘जय समैक्य आंध्र’ नावाचा पक्ष स्थापन केला.

हेही वाचा : जयराम रमेश यांनी शिंदे कुटुंब गद्दार असल्याचा केला आरोप, ज्योतिरादित्य शिंदेंनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, “आम्ही मराठे…”

पण, २०१४ साली झालेल्या निवडणुकांत ‘जय समैक्य आंध्र’ या पक्षाने चांगले प्रदर्शन केले नाही. त्यामुळे रेड्डींनी पुन्हा काँग्रेसचा ‘हात’ पकडला. मात्र, आता रेड्डींनी आज भाजपात प्रवेश केला आहे. येणाऱ्या दिवसांत भाजपा त्यांना कोणते पद याकडे पाहणे गरजेचं असणार आहे.

हेही वाचा : मनीष सिसोदियांचं तिहार जेलमधून देशवासीयांना खुलं पत्र; म्हणाले, “देशाचा सगळ्यात मोठा मॅनेजर…!”

भाजपात प्रवेश केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना किरण कुमार रेड्डी म्हणाले, “काँग्रेस पक्षाला सोडेन, याची कधीच कल्पना केली नव्हती. पण, एक म्हण आहे, ‘माझा राजा खूप हुशार आहे. तो स्वत: विचार करत नाही. आणि कोणाचा सल्लाही ऐकत नाही,” असं किरण कुमार रेड्डी यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former andhra cm kiran kumar reddy joins bjp weeks after leaving congress ssa