नितीश कुमारांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. नितीश कुमारांनी रविवारी राजभवनात राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे राजीनामा देताना एनडीए सरकार स्थापन करण्याचा दावाही केला. तसंच, भाजपाच्या पाठिंब्याचे पत्रही त्यांनी राज्यपालांना सादर केले. हे पत्र राज्यपालांनी स्वीकारले असून आज सायंकाळी पाच वाजता शपथविधीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भाजपाचे बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नितीश कुमार यांनी आज सकाळी जनता दल (संयुक्त) विधिमंडळाच्या बैठकीत राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला. या राजीनामा सत्रानंतर भाजपाने आपल्या आमदारांना घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले. हे पाठिंब्याचे पत्र नितीश कुमारांनी राज्यपालांना सादर केले. यामध्ये एनडीए सरकार स्थापन करण्यास इच्छुक असल्याचं सांगण्यात आलं. हे पत्र राज्यपालांनी स्वीकारलं आहे. त्यामुळे आज पाच वाजता शपथविधी सोहळा होणार आहे.

दरम्यान, सम्राट चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर विजय सिन्हा यांना उपनेतेपद देण्यात आले आहे. “मला खात्री आहे की पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि जे. पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनात दोन्ही नेते बिहारच्या भल्यासाठी काम करतील”, असं विनोद तावडे यांनी म्हटलं. तसंच, नितीशकुमार यांची बिहारमध्ये एनडीएच्या प्रमुखपदीही नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा >> राजीनामा देण्याची वेळ का आली? नितीश कुमारांनी मांडली व्यथा; म्हणाले…

दरम्यान, नितीश कुमार मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असून भाजपाकडून दोघांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. याबाबत अद्यापही अधिकृत माहिती आलेली नसून सायंकाळी पाच वाजताच संपूर्ण चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

नितीश कुमारांनी राजीनामा का दिला?

तुमच्यावर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची परिस्थिती का उद्भवली? असा प्रश्न आज पत्रकारांनी नितीश कुमारांना विचारला. त्यावर नितीश कुमार म्हणाले, राज्यकारभार योग्य रितीने चालत नव्हता, त्यामुळे माझ्यावर राजीनामा देण्याची वेळ आली. तुम्ही पत्रकारांनी मला यापूर्वी अनेकदा विचारल होतं. परंतु, तेव्हा मी बोलणं बंद केलं होतं. आम्ही सर्व परिस्थिती पाहत होतो. त्यानंतर मला लोक वेगवेगळे सल्ले देऊ लागले. मी माझ्या पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांचे वेगवेगळे सल्ले घेतले. त्यानंतर आज राजीनामा दिला आहे आणि आमचं सरकार विसर्जित केलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Governor accepts ndas proposal in bihar nitish kumar will take oath as chief minister in the evening sgk
First published on: 28-01-2024 at 13:59 IST