Gujarat Congress leader Rajesh Soni arrested after Posts On Operation Sindoor : गुजरात काँग्रेसचे सरचिटणीस राजेश सोनी यांना शुक्रवारी राज्याच्या सायबर सेलने अटक केली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल दिशाभूल करणारी आणि मानसिक खच्चीकरण करणारा मजकूर सोशल मीडियावर पोस्ट केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

पोलीसांनी सांगितले की , सोनी यांच्यावर फेसबुकवर आक्षेपार्ह वक्तव्य फेसबुकवर पोस्ट केल्याचा आरोप आहे. भारताने पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला उत्तर देत पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवले होते.

पोलिस अधीक्षक (सीआयडी-सायबर क्राइम) भारतसिंह टांक म्हणाले की सोनी यांच्या पोस्ट फक्त दिशाभूल करणाऱ्याच नाहीत राष्ट्रीय सुरक्षेसाठी देखील धोकादायक आहेत. “या मजकूराने लष्करी कर्मचाऱ्यांचे मनोबल खचले आणि देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण झाला, असे टांक म्हणाले.

सोनी यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १५२ (देशाच्या एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणे) आणि कलम ३५३ (१)(अ) (गैरप्रकारांना उत्तेजना देणारे विधान करणे) यांच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. काँग्रेस पक्षाने अद्याप सोनी यांच्या अटकेबाबत अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat congress leader rajesh soni arrested for misleading posts on operation sindoor crime news rak