पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील तीन दिवसांपासून गुजरात दौऱ्यावर आहेत. गुजरात सरकारच्या ‘व्हायब्रंट गुजरात’ या जागतिक गुंतवणूक परिषदेच्या कार्यक्रमासाठी मागील तीन दिवसांपासून गांधीनगरमध्ये असणाऱ्या मोदींनी आज सकाळी अचानक आपल्या आईची भेट घेतली. अगदी मोजक्या सुरक्षारक्षकांसोबत ते गुजरातमधील आपल्या घरी पोहचले. सकाळी नऊ वाजता त्यांनी हिराबेन यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकांआधी आपल्या आईचा आशिर्वाद घेण्यासाठी मोदींनी ही भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान मोदी सकाळी नऊच्या सुमारास गांधीनगर येथील घरी पोहचले आणि साडे नऊ वाजता ते अहमदाबाद विमानतळाच्या दिशेने रवाना झाले. सामान्यपणे मोदी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आवर्जून आपल्या आईला भेटतात. मात्र त्यावेळी त्यांची धावती भेट अवघ्या १५ मिनिटांची असते. यावेळेस त्यांनी आपल्या दौऱ्यामधून वेळात वेळ काढून आपल्या आईची भेट घेत अधिक काळ आपल्या आईबरोबर घालवला. हिराबेन यांची प्रकृती मागील काही काळापासून ठिक नसल्याने मोदींनी आईची चौकशी करण्यासाठी ही भेट घेतल्याचेही बोलले जात आहे. या भेटीनंतर पंतप्रधान मोदी अहमदाबाद विमानतळावरून हझीराकडे रवाना झाले. हझीरा येथील एल अँड टीच्या आर्मर्ड सिस्टम कॉम्प्लेक्समध्ये रणगाड्यांची चाचण्यांची पहाणी केली. मोदी ‘के-९ वज्र- टी’ ही तोफ लष्कराच्या स्वाधीन करणार आहेत. तसेच दीव-दमणमधील १७०० कोटी रुपयांच्या योजनांचेही ते उद्घाटन करणार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat pm modi meets his mother hiraben in gandhinagar