Gurugram : देशभरात दररोज अनेक वेगवेगळ्या अपघाताच्या घटना घडल्याची माहिती समोर येते. खरं तर दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचंही पाहायला मिळतं. मात्र, आता एक आगळी वेगळी घटना समोर आली आहे. खरं तर अनेकजण यावर विश्वास ठेवणार नाहीत. मात्र, मुद्दामहून अपघात करून पैशाची मागणी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार गुरुग्राममधून समोर आला आहे. याबाबत सोशल मीडियावरही मोठी चर्चा सुरु आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं प्रकरण काय?

गुरुग्राममध्ये दुपारच्या वेळी एका रस्त्यावरून काही पादचारी एक आरामात चालत होतं. मात्र, त्याचवेळी एका कारमधून पाठिमागून एर्टिगा गाडीच्या साइड मिररने जाणूनबुजून धडक दिली. एर्टिगा गाडी पाठिमागून आल्यानंतर आणि चालणाऱ्यांपैकी एकाला गाडीच्या साइड मिरची धडक बसल्यानंतर गाडी पुढे जाऊन निघून थांबली. सुरुवातीला पादचाऱ्यांनी माफी मागण्यासाठी चालक थांबला असल्याचं वाटलं. मात्र, जेव्हा गाडीमधून ड्रायव्हरने वाहनातून बाहेर आला आणि रसत्याने चालणाऱ्यांना शा‍ब्दिक बाचाबाचि करत शिवीगाळ केली. तसेच रस्त्याने चालणाऱ्यांवर त्या ड्रायव्हरने गाडीच्या आरशाचे नुकसान केल्याचा आरोप केला. तसेच धमक्या देत त्यांच्याकडून रोख रकमेची मागणी केली.

तसेच गाडी चालकाने शिवीगाळ करत ‘तुम्हारे बाप की रोड है, मेरा शिशा थोड दिया”, असं म्हणत रस्त्याने चालणाऱ्यांशी वाद घातला. यावेळी त्या ठिकाणी लोकांनी गर्दीही केली होती. त्यांच्यामध्ये जवळपास तैनात असलेले सुरक्षा रक्षकही होते. सर्वांनी प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कारचालकाची गैरवर्तणूक वाढू लागली. असं वाटत होतं की हाणामारी होईल. पैसे वसूल केल्यावरच ती व्यक्ती राजी होईल. मात्र, त्यानंतर हे प्रकरण शांत झालं. या संदर्भात एक पोस्ट व्हायरल होत असून याबाबतच वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

दरम्यान, व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, लोकांनी अशा घटनांपासून सावध राहिलं पाहिजे. तसेच या पोस्टवर लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये सहानुभूती व्यक्त करत अनेकांनी रस्त्याऐवजी फूटपाथवर चालण्याचा सल्ला दिला. तसेच एकाने तर रस्त्याने चालताना असे प्रकार होत असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gurugram news a car driver hit a pedestrian and demanded money gkt