Haryana Election Results 2019 : हरयाणा विधानसभा निवडवणुकीत भाजपाला जरी स्पष्ट बहुमत मिळालेलं नसेल तरी देखील सर्वात मोठा पक्ष भाजपाच ठरलेला आहे. तर अपक्ष आमदारांना बरोबर घेत भाजपा पुन्हा सरकार स्थापनेच्या प्रयत्नात आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर राज्यपाला सत्यनारायण आर्य यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती आहे. ९० सदस्य संख्या असलेल्या हरयाणा विधानसभेत भाजपा ३९ जागांवर विजयी झाली आहे तर १ जागेवर आघाडीवर आहे. तर बहुमतापासाठी भाजपाला सहा जागा कमी आहेत. त्यामुळे अपक्ष आमदारांचा पाठिंबा घेत भाजपा सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे.
हरयाणामधील निवडणूक निकालांवरून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे व प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचे अभिनंदन केले आहे. शाह यांनी ट्विटद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. मागील पाच वर्षात पंतप्रधान मोदी यांच्या केंद्रीय नेतृत्वात खट्टर सरकारने हरयाणामधील जनतेच्या कल्याणासाठी सर्वप्रकारे प्रयत्न केले आहेत. भाजपाल सर्वात मोठा पक्ष बनवून पुन्हा सेवेची संधी दिल्याबद्दल जनतेचे आभार व्यक्त करतो. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, सुभाष बराला व सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन, असे त्यांनी म्हटले आहे.
Highlights
हरयाणामधील निवडणूक निकालांवरून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे व प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचे अभिनंदन केले आहे. शाह यांनी ट्विटद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. मागील पाच वर्षात पंतप्रधान मोदी यांच्या केंद्रीय नेतृत्वात खट्टर सरकारने हरयाणामधील जनतेच्या कल्याणासाठी सर्वप्रकारे प्रयत्न केले आहेत. भाजपाल सर्वात मोठा पक्ष बनवून पुन्हा सेवेची संधी दिल्याबद्दल जनतेचे आभार व्यक्त करतो. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, सुभाष बराला व सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन.
हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर सरकार स्थापनेसाठी दावा करण्याची शक्यता आहे. त्यांनी राज्यपाल सत्यव्रत नारायण आर्य यांची भेट घेण्यासाठी सायंकाळी ६ वाजेची वेळ मागितली असल्याचेही समोर येत आहे. शिवाय राज्यात सध्या दुष्यंत चौटाला यांचा जननायक जनता पक्ष सरकार कुणाचे असेल हे ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे जेजेपीच्या मदतीन सत्तास्थापनेसाठी भाजपाकडून हालचाली सुरू आहे.
हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते भूपेंद्रसिंह हुड्डा हे गढी संपला किलोई मतदारसंघातुन विजयी झाले आहेत. विद्यमान सरकारच्याविरोधात जनादेश असल्याचे त्यांनी निकालानंतर म्हटले आहे. तसेच, एका मजबूत सरकारच्या स्थापनेसाठी सर्व विरोधी पक्षांसह अपक्षांनी एकजुट दाखवावी असे देखील आवाहन केले आहे.
हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे करनाल विधानसभा मतदारसंघातु तब्बल ४१ हजार ९५० मतांनीआघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे तरलोचन सिंग हे पिछाडीवर आहेत
हरयाणामध्ये भाजपा व काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. सध्या हाती आलेल्या माहितीनुसार भाजपाने पुन्हा एकदा आघाडी घेतली असून ४१ जागांवर भाजपा पुढे आहे. तर काँग्रेस ३१ जागांवर आघाडीवर आहे.
हरयाणा काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी पत्रकारपरिषद घेत हरियाणातील जनतेचे आभार व्यक्त केले, तसेच राज्यभरातील विरोधी पक्षांना भाजपाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. हुड्डा यांनी म्हटले की, अशी संधी पुन्हा येणार नाही. मी विरोधकांना व अपक्षांना एकत्र येऊन काँग्रेसला साथ देत सरकार स्थापनेसाठी आवाहन करत आहे. सर्वांना समान मान-सन्मान मिळेल असेही ते म्हणाले.
भाजापाचे उमेदवार योगेश्वर दत्त बरोड येथून ३५९० मतांनी आघाडीवर
भाजपाच्या उमेदवार बबिता फोगाट २३०० मतांनी आघाडीवर आहेत
हरयाणाचे मुख्यमंत्री १४ हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी मिळाली आहे
भाजपाला हरयाणात ४० जागांवर आघाडी मिळाली आहे.
हरयाणा येथे मतमोजणी सुरु आहे. या मतमोजणी दरम्यान मनोहरलाल खट्टर ४ हजार ५८८ मतांनी आघाडीवर गेले आहेत.
काँग्रेस, भाजपा आणि जेजेपी या तिन्ही पक्षांना हरयाणात एक एक जागेवर आघाडी मिळाली आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
भाजपा नाही किंवा काँग्रेस नाही तर JJP च्या हाती सत्तेच्या चाव्या राहतील असं JJP चे नेते दुष्यंत चौटाला यांनी म्हटलं आहे.
हरयाणा आणि महाराष्ट्रात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. काही वेळातच पहिला कल हाती येईल.
निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर हरयाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
मला लोक निवडून देतील याबाबत माझ्या मनात काहीही शंका नाही असं कुस्तीपटू बबिता फोगाट यांनी म्हटलं आहे. हरयाणा निवडणूक निकाल आज लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बबिता फोगाट यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी भाजपात प्रवेश केला