Hundreds of devotees carry snakes Video Goes Viral : बिहारच्या समस्तीपुर जिल्ह्यातील सिंघिया घाटावर नाग पंचमीच्या यात्रेत शेकडो भाविक सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. या यात्रेची खाासीयत म्हणजे यामध्ये लोक बरोबर साप घेऊन यामध्ये सहभागी होतात. या भाविकांचे साप घेऊन या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.,

हा दरवर्षी होणारा धार्मिक कार्यक्रम हा सिंघिया बाजारातील मा भगवती मंदिरात प्रार्थना केल्यानंतर सुरू झाला. त्यानंतर भाविक बुधी गंडक नदीकडे जाऊ लागले. या मिरवणुकीत लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सहभागी झालेल्या प्रत्येकाकडे एक-साप पाहायला मिळाला. हा साप एकतर त्यांच्या गळ्यात गुंडाळलेला होता किंवा डोक्यावर किंवा हातात घेतलेला होता.

या धार्मिक सोहळ्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये लोक अगदी सहजपणे हातात किंवा डोक्यावर साप घेऊन गर्दीत चालताना दिसत आहेत. यासंबंधीचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे. काही व्हिडीओमध्ये लोक काठीवर गुंडाळून साप घेऊन जाताना देखील दिसत आहेत. गर्दीतील कोणीही सापाला घाबरताना मात्र दिसत नाहीये.

या परंपरेचा भाग म्हणून भाविक स्थानिक सर्प देवी माता विशहारीचा नामघोष केला आणि याबरोबरच प्रार्थना केला. कथितपणे काही भाविकांनी तोंडात साप पकडण्याचे धाडसी काम देखील केले. यानंतर पूजा करून या सापांना जवळच्या जंगली सोडण्यात आले.

या यात्रेत मितिला भागातून मोठ्या प्रमाणात लोक येतात, ज्यामध्ये खागरिया, सहारसा, बेगुसराय आणि मुजफ्फरपुर या जिल्ह्यातून भाविक येतात. स्थानिक सांगतात की ही १०० वर्ष जुनी परंपरा असून एका अनेक पिढ्यांपासून चालत आलेली आहे.

सार्वजनिक स्वरूपात काढल्या जाणाऱ्या मिरवणुकीबरोबरच महिला येथे गहवरांमध्ये (Gahvars) एक खास पुजा देखील करतात. याच्या माध्यमातून त्या नाग देवतेकडे कुटुंबाचे आरोग्य, संपदा आणि संरक्षण याची मागणी कतातत. त्यांची मागणी पूर्ण झाल्यानंतर त्या नाग पंचमीला परत येतात आणि प्रसाद अर्पण करतात.

एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, या संपूर्ण यात्रा कार्यक्रमात साप चावल्याची किंवा कोणी जखमी झाल्याच्या एकाही घटनेची नोंद नाही