भारतात ईव्हीएमद्वारे निवडणुका घेतल्या जातात. विरोधकांकडून या ईव्हीएमला प्रचंड विरोध आहे. यावरूनच, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि सध्या तुरुंगात असलेले इम्रान खान यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. पाकिस्तानातही ईव्हीएम असते तर हेराफेरीचे सर्व प्रश्न एका तासात सुटले असते, असं इम्रान खान म्हणाले. डॉन या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तान तरहीक-ए-इन्साफच्या संस्थापक इम्रान खान यांनी अल-कादिर ट्रस्ट खटल्याच्या सुनावणीनंतर अदियाला तुरुंगात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, पाकिस्तान निवडणूक आयोग, काही राजकीय पक्ष आणि आस्थापनांनी इलेक्ट्रॉनिक मतदान आणण्याची योजना उलथवून लावली. तसंच, सार्वत्रिक निवडमुकीत जनतेचा जनादेश चोरणाऱ्या अधिकाऱ्यांवर देशद्रोहाची कारवाई करा.

हेही वाचा >> लोकसभेच्या निवडणुका जाहीर होताच मोदींना परदेशातूनही पाठिंबा, समर्थनासाठी ‘या’ देशात निघाली भव्य कार रॅली

इम्रान खान यांनी दावा केला की त्यांच्या पक्षाला ३० मिलिअनपेक्षाही जास्त मते मिळाली. तर, उर्वरित १७ राजकीय पक्षांनी एकत्रितपणे समान मते मिळवली. पीटीआयने आयएमएफबरोबर निवडणुकांमध्ये अनियमिततता केली आणि गैर सरकारी संस्थांनी देखील निवडणूक प्रक्रियेतील त्रुटी निदर्शनास आणल्या.

इस्लमाबाद उच्च न्यायालयाने सायफर आणि तोशाखाना प्रकरणात जामीन मंजूर केल्यास अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात त्यांना दोषी ठरवले जाऊ शकते, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य करताना इम्रान खान म्हणाले, नाजूक अर्थव्यवस्थेमुळे विद्यमान सरकार टीकू शकत नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imran khan says all poll rigging would have been solved if pakistan had evms sgk