Maharashtra News Updates : भारत आज आपला ७९ वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करत आहे. राजधानी दिल्ली ते देशाच्या प्रत्येक हा दिवस साजरा केला जात आहे. दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले यांनंतर पंतप्रधान देशाला संबोधित करत आहेत. मोदींनी लागोपाठ १२व्या वेळा तिरंगा झेंडा फडकवला. असे करणारे ते पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान बनले आहेत.

Live Updates
08:53 (IST) 15 Aug 2025
दिवाळीत देशवासीयांना खास भेट मिळणार; पंतप्रधान मोदींची घोषणा

या दिवाळीला आपल्या डबल दिवाळीचं काम मी करणार आहे. या दिवाळीला तुम्हाला एक मोठी भेट देशवासीयांना मिळणार आहे. गेल्या ८ वर्षात आपण जीएसटीमध्ये मोठ्या सुधारणा केल्या…. आठ वर्षानंतर काळाची गरज आहे की आम्ही हे रिव्ह्यूव करावे…. आम्ही नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स घेऊन येत आहोत. हा दिवाळीत तुमच्यासाठी भेट ठरतील. गरजेच्या वस्तूंवरील कर मोठ्या प्रमाणात कमी केले जातील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

08:47 (IST) 15 Aug 2025
जागतिक अस्थिरतेच्या काळात भारत आशेचा किरण – पंतप्रधान मोदी

भारताची अर्थव्यवस्थेबाबत संपूर्ण जगाला विश्वास आहे. इतक्या जागतिक अस्थिरतेच्या काळात आपण आशेचा किरण ठरलो आहोत. आज महागाई नियंत्रणात आहे. आपले फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह मजबूत आहेत. आपले मॅक्रो इकॉनॉमिक इंडिकेटर्स खूप मजबूत आहेत. ग्लोबल रेटिंग एजन्सी देखील भारताचे कौतुक करते. वाढत्या अर्थव्यवस्थेचा लाभ देशातील गरीब, शेतकरी, महिला, मध्यमवर्गाला मिळेल. – पंतप्रधान मोदी

08:25 (IST) 15 Aug 2025

जेट इंजिन मेड इन इंडिया असले पाहिजे – मोदी

आज माझे लाल किल्ल्यावरून देशाच्या तरूण शास्त्रज्ञ, कौशल्यपूर्ण तरूणांना, अभियंत्र्यांना आणि सरकारच्या सर्व विभागांना अवाहन आहे की आपल्या मेड इंन इंडिया फायटर जेटसाठी जेट इंजिन आपले स्वतःचे असले पाहिजे- पंतप्रधान मोदी.

08:24 (IST) 15 Aug 2025

पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम यांना राष्ट्रपती पदक

वाई विभागाचे पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम यांना आपल्या प्रदीर्घ सेवेमध्ये केलेल्या गुणवत्तापूर्ण कामाबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. …वाचा सविस्तर
08:21 (IST) 15 Aug 2025
वर्षाच्या अखेरपर्यंत ‘मेड इंन इंडिया’ चिप बाजारात दाखल होणार – पंतप्रधान मोदी

आम्ही मिशन मोडमध्ये सेमिकंडक्टरसाठी काम सुरू केले आहे. सहा वेगवेगळे सेमिकंडक्टरचे युनिट्स प्रत्यक्षात येत आहेत. चार नव्या युनिट्सना ग्रीन सिग्नल दिला आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत ‘मेड इन इंडिया’ चिप बाजारात दाखल होईल – पंतप्रधान मोदी

08:16 (IST) 15 Aug 2025

मास्तरीण बाईंनी घेतला ८० व्या वर्षी तास !

एकेकाळी खडू-फळ्यावर शिकवणाऱ्या शिक्षिकेने यावेळी इंटरॅक्टिव्ह बोर्डचा सहज वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्वही स्पष्ट केले. …अधिक वाचा
08:09 (IST) 15 Aug 2025
रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही – पंतप्रधान मोदी

भारताने ठरवले आहे रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही. देशवासीयांना लक्षात आले आहे की. सिंधू करार किती अन्यायपूर्ण आणि किती एकतर्फा आहे. भारतातून निघणाऱ्या नद्यांचे पाणी शत्रूच्या शेतीला पाणी देत आहे. आणि माझ्या देशातील जमीन तहानलेली आहे. – पीएम मोदी

08:02 (IST) 15 Aug 2025
आम्ही धमकी सहन करणार नाहीत – पीएम मोदी

पीएम मोदी लाल किल्ल्यावरून संबोधित करताना म्हणाले की न्यूक्लियर धमक्यांना सहन करणार नाही. आम्ही कोणतेही ब्लॅकमेल सहन करणार नाहीत. जर शत्रूने प्रयत्न सुरूच ठेवले तर लष्कर निश्चित करेल. लष्कराच्या अटींवर, जे वेळ निश्चित करतील, ज्या पद्धती ठरवतील, सेनेने निश्चित केल्याल्या लक्ष्यानुसार आम्ही आता अंमलबजावणी करू – पंतप्रधान मोदी

07:59 (IST) 15 Aug 2025
पंतप्रधान मोदींनी दिला ‘गार्ड ऑफ ऑनर’

७९व्या स्वतंत्रता दिवसाच्या निमीत्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लाल किल्ल्यावर गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

07:57 (IST) 15 Aug 2025

२२ तारखेनंतर आम्ही आमच्या सैन्याला मोकळी सूट दिली. रणनिती त्यांनी ठरवावे, लक्ष्य त्यांनी निश्चित करावे, वेळ देखील त्यांनी ठरवावा आणि आपल्या सैन्याने ते करून दाखवले जे कित्येक दशकांपासून झाले नव्हते. शेकडो किलोमीटर शत्रूच्या प्रदेशात आतमध्ये धुसून दहशतवादी ठिकाणांना नष्ट करण्यात आले – पीएम मोदी

07:51 (IST) 15 Aug 2025
देशाच्या वीर जवानांनी शत्रूला कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा दिली- पंतप्रधान मोदी

आज १५ ऑगस्टचे एक विशेष महत्व देखील मला पाहायला मिळत आहे, मला खूप अभिमान वाटत आहे की आज मला लाला किल्ल्यावरून ऑपरेशन सिंदूरच्या वीर जवानांना सॅल्यूट करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या वीज सैनिकांनी शत्रूला त्यांना कल्पनेच्या पलीकडची शिक्षा दिली आहे. २२ एप्रिल रोजी सीमेपलीकडून येऊन दहशतवाद्यांनी ज्या प्रकारचे हत्याकांड केले. धर्म विचारून लोकांना मारले. पत्नीच्या समोर पतीला गोळ्या घातल्या. मुलांच्या समोर वडिलांना ठार केले. संपूर्ण भारत आक्रोशाने भरलेला होता. ऑपरेशन सिंदूर त्याच आक्रोशाची अभिव्यक्ती होते. – पंतप्रधान मोदी