Israel Iran News Highlights: इस्रायल व इराण यांच्यातील युद्धजन्य संघर्षामुळे दोन्ही देशांमधील नागरिकांचं मोठं नुकसान होत असल्याचं दिसून येत आहे. इराणमध्ये आत्तापर्यंत या संघर्षामुळे ६०० हून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. इराणकडून इस्रायलमध्येही हल्ले होत असून इस्रायलमधील अधिकृत आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. या पार्श्वभूमीवर एकीकडे जागतिक समुदायाकडून शांततेचं आवाहन केलं जात असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक विधानांमुळे तणाव अधिक वाढत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
Israel Iran Battle Highlights, 19 June 2025: इस्रायल – इराण संघर्षासंदर्भातले सर्व अपडेट एका क्लिकवर
इस्रायलमधील भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन; ‘ऑपरेशन सिंधू’ बाबत परराष्ट्र मंत्रालयाकडून निवेदन
इस्रायलमधील भारतीय दूतावासाने सर्व भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि इस्रायली अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “भारत सरकार परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देते. सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत राहील. सर्व शक्य मदत देण्यासाठी दूतावास भारतीय नागरिकांच्या सतत संपर्कात आहे.”
हेरगिरी प्रकरणी इराणकडून २४ जणांना अटक
तस्निम वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, इराणी पोलिसांनी गुरुवारी जाहीर केले की, इस्रायलसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली २४ जणांना अटक करण्यात आली आहे.
पश्चिम तेहरानचे पोलीस कमांडर किउमर अजीजी म्हणाले की, “संशयित आरोपी शत्रू देशासाठी ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने काम करत होते.”
शी जिनपिंग यांचे आवाहन
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी एक मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, इस्रायलने लवकरात लवकर वाटाघाटीसाठी चर्चेच्या टेबलावर यावे आणि इराणसोबत शस्त्रविराम करावा. युद्ध हा पर्याय नाही.
इस्रायलचा इराणमध्ये हवाई हल्ला
इस्रायलने पश्चिम इराणमध्ये हवाई हल्ले केले असून, इराणच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले आहे. इस्रायली रुग्णालयावरील हल्ल्यापासून, इराणविरुद्ध सूड उगवण्याची प्रक्रिया तीव्र झाली आहे.
ऑपरेशन सिंधू : इस्रायल सोडू इच्छिणाऱ्या भारतीयांना मायदेशी परतण्यासाठी सरकार करणार मदत
इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढल्यानंतर, केंद्र सरकारने गुरुवारी ऑपरेशन सिंधू अंतर्गत इस्रायल सोडू इच्छिणाऱ्या नागरिकांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. इस्रायल आणि इराणमधील संघर्ष तीव्र होत असल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.
“इस्रायलने अमेरिकेची मदत मागणं कमकुवतपणाचं लक्षण”, खोमेनींची टीका
इराणचे सर्वोच्च नेते खोमेनी यांनी ‘एक्स’वर पोस्ट केली असून, यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “झायोनिस्ट राजवटीचे अमेरिकन मित्र अशा गोष्टी बोलत आहेत, ज्या त्या राजवटीच्या कमकुवतपणाचे आणि अक्षमतेचे लक्षण आहेत.”
“मी आपल्या प्रिय देशाला सांगू इच्छितो की, जर शत्रूला असे वाटले की आपण त्यांना घाबरत आहोत, तर ते आपल्याला सोडणार नाहीत,” असे खोमेनी यांनी पुढे म्हटले आहे.
इस्रायलने इराणमधील बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पावर केलेले हवाई हल्ले तात्काळ थांबवावेत, असे आवाहन रशियाच्या परराष्ट्र खात्याने केले आहे. या प्रकल्पात रशियन तज्ज्ञ कार्यरत आहेत.
बुशेहर हा इराणमधील एकमेव कार्यरत अणुऊर्जा प्रकल्प आहे. या ठिकाणी रशियन इंधन वापरण्यात येते. अण्वस्त्र प्रसाराचा धोका टाळण्यासाठी वापरानंतर रशिया इंधन परत घेते.
इस्रायल इराण संघर्षात अमेरिकेने उडी घेऊ नये असे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी म्हटले आहे. तसे झाल्यास गंभीर परिणाम होतील असा धमकीवजा इशाराही रशियानं दिला आहे.
Israel-Iran: अनेक मोठे लोक इराण सोडून जात आहेत
न्यू इराण चळवळीच्या एका मोठ्या नेत्याचा दावा केला आहे की, सध्या अनेक मोठ्या व्यक्ती इराण सोडून इतर देशांमध्ये गेल्या आहेत. स्वतः खामेनी देखील देश सोडण्याची संधी शोधत आहेत.
Russia Warns US for Intervention in Israel-Iran War: रशियाचा अमेरिकेला इशारा
इस्रायल-इराण युद्धादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सातत्याने भूमिका मांडली आहे. शिवाय, अमेरिका इराणवर हल्ला करण्याची शक्यताही आता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर रशियानं अमेरिकेला धोक्याचा इशारा दिला आहे. “अमेरिकेकडून इस्रायल व इराण यांच्यातील संघर्षात कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, तर त्यातून परिस्थिती आणखी चिघळू शकते”, असं रशियानं म्हटलं आहे.
Iran Uses Sejjil Ballestic Missile First Time: इराणनं सेजिल क्षेपणास्राचा वापर केला?
बुधवारी मध्यरात्री इराणनं त्यांच्या सेजिल या विध्वंसक क्षेपणास्त्राचा वापर केल्याचं सांगितलं जात आहे. सेजिल हे द्विस्तरीय जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राचा टप्पा तब्बल २ हजार किलोमीटर इतका आहे. ५९ फूट लांब आणि ७०० किलो वजनाचं हे मिसाईल इराणनं पहिल्यांदाच वापरल्याचं बोललं जात आहे.
Turkeye Backs Iran: तुर्कियेचा इराणला पाठिंबा
इराणला आपलं संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार असल्याची प्रतिक्रिया तुर्कियेचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी दिली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी वंशहत्या करण्यात हिटलरला कधीच मागे टाकलं आहे. इस्रायलच्या आक्रमकतेला आळा घालणं हे जगासाठी आणि मानवतेसाठी अत्यंत आवश्यक आहे, अशा शब्दांत एर्दोगन यांनी इस्रायलला लक्ष्य केलं आहे.
Iran Missile Hit Israels Stock Exchange Building: इस्रायलच्या शेअर मार्केट इमारतीवर इराणचा हल्ला?
इस्रायलमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इराणनं इस्रायलच्या रमन गान परिसरातील शेअर मार्केटच्या इमारतीवर क्षेपणास्त्र डागलं आहे. आधी दक्षिण इस्रायलमधील सर्वात मोठ्या रुग्णालयावर क्षेपणास्त्र डागल्यानंतर इराणनं दुसरा हल्ला शेअर मार्केट इमारतीवर केल्याचं इस्रायलच्या माध्यमांनी वृत्तात म्हटलं आहे. एककडे इस्रायलच्या आयर्न डोमची चर्चा असताना दुसरीकडे इराणनं आपल्याला इस्रायलवर क्षेपणास्त्र वा ड्रोन डागण्यासाठी कोणतीही अडचण येत नसल्याचा दावा केला आहे.
Israel Attacked Iran’s Arak Nuclear Reactor: इस्रायलचा इराणच्या अराक न्यूक्लीअर रिअॅक्टरवर हल्ला
इस्रायलनं इराणच्या अराक न्यूक्लिअर रिअॅक्टर साईटवर हवाई हल्ला केल्याचं वृत्त इराणच्या राष्ट्रीय वाहिनीनं दिलं आहे. मात्र, या हल्ल्यानंतर संबंधित तळावर कोणत्याही प्रकारचं उत्सर्जन झालं नसल्याचं सांगण्यात येत आहे. हल्ल्याच्या आधीच हा तळ इराण प्रशासनानं खाली केला होता, अशीही माहिती देण्यात आली आहे.
Israel Hospital Viral Video: क्षेपणास्त्र पडल्यानंतर इस्रायलमधील रुग्णालयात हाहाकार उडाला
क्षेपणास्त्र पडल्यानंतर इस्रायलमधील रुग्णालयात हाहाकार उडाला
The Iranian regime targeted Soroka Hospital in Beersheba with a ballistic missile—hitting a major medical center.
— Israel ישראל (@Israel) June 19, 2025
We will not stand by. We will continue doing what must be done to defend our people. pic.twitter.com/4ldeTQhATW
Iran Attack Isreal: क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायलमधील रुग्णालयाचे व्हिडीओ व्हायरल
इराणनं या रुग्णालयावर क्षेपणास्त्र डागल्यानंतर या हल्ल्यानंतरचे रुग्णालयाचे काही व्हिडीओदेखील आता व्हायरल होऊ लागले आहेत
Donald Trump News: डोनाल्ड ट्रम्प ऐकेनात, मोदींनी स्पष्ट केल्यानंतरही पुन्हा म्हणाले, “मीच भारत व पाकिस्तान यांच्यातलं युद्ध थांबवलं”!
इराणनं आज सकाळी इस्रायलवर डागलेलं क्षेपणास्त्र थेट एका रुग्णालयावर जाऊन आदळल्याची माहिती तिथे बचावकार्य करणाऱ्या एका व्यक्तीने दिल्याचं वृत्त पीटीआयने एपी न्यूजच्या हवाल्याने दिलं आहे.
Soroka Hospital in Beersheba – where Jews, Muslims, Christians, and Arab Bedouin receive care – was just hit by an indiscriminate Iranian ballistic missile.
— Israel Foreign Ministry (@IsraelMFA) June 19, 2025
Israel will continue to do what must be done to protect all its people, from all walks of life. pic.twitter.com/JNgYYYcz1N
Israel-Iran War: ऑस्ट्रेलियानं आपल्या नागरिकांना इस्रायलमधून मायदेशी नेण्यास केली सुरुवात
इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरातल्या देशांनी आपापल्या नागरिकांना माघारी मायदेशी आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. भारतानं इराणमधून आपल्या नागरिकांना परत आणण्यास सुरुवात केली असून ऑस्ट्रेलियानं इस्रायलमधील आपल्या नागरिकांना मायदेशी आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. एकूण ३ हजार ऑस्ट्रेलियन नागरिकांनी इस्रायलमधून मायदेशी परत जाण्यासाठी नोंदणी केली आहे.
Israel Iran War: इस्रायल हल्ल्यांची व्याप्ती वाढवणार?
इस्रायलनं आता तेहरानसह अरक आणि खांदाब या शहरांनाही लक्ष्य करण्याचं नियोजन केलं आहे. इस्रायल लष्करानं या शहरांमधल्या नागरिकांना शहर खाली करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
The Israeli military warns people to evacuate area around Iran's Arak heavy water reactor, reports AP. pic.twitter.com/H9TEMEoIBk
— Press Trust of India (@PTI_News) June 19, 2025
Iran Death Toll: इराणमध्ये आत्तापर्यंत युद्धाचे ६३९ बळी, १३२९ जखमी
इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यात आत्तापर्यंत ६३९ लोकांचा बळी गेला असून १३२९ जखमी झाल्याची माहिती मानवाधिकार संघटनांकडून समोर आली आहे.
Israeli strikes on Iran have killed at least 639 people and wounded 1,329 others, a human rights group says, reports AP. pic.twitter.com/CkLUIlZiKw
— Press Trust of India (@PTI_News) June 19, 2025
Israel Iran War: भारतात राहणाऱ्या इराणी महिलेची युद्धाबाबत प्रतिक्रिया…
इराणमधून काही वर्षांपूर्वी लग्न करून भारतात आलेल्या फैझा या महिलेनं इस्रायल-इराण युद्धाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुरादाबादमध्ये राहणाऱ्या दिवाकर कुमार यांच्याशी तिचा विवाह झाला होता. तीन दिवसांपूर्वी इराणमध्ये राहणाऱ्या आपल्या पालकांशी पतीच्या सिमकार्डवरून आपण बोललो होतो, पण त्यानंतर त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही, अशी प्रतिक्रिया फैझा यांनी दिली आहे.
VIDEO | Here's what Faiza, an Iranian woman married to Diwakar Kumar of Moradabad, said as she is unable to contact her family in Iran:
— Press Trust of India (@PTI_News) June 18, 2025
"… A year ago, my husband and I arrived here with many dreams. One of those dreams was to open a Persian café to share our culture with… pic.twitter.com/3trIEyFdLm
Donald Trump on Iran: जोपर्यंत एखादी गोष्ट पूर्णपणे संपलेली नसते, तोपर्यंत काहीही संपलेलं नसतं – डोनाल्ड ट्रम्प
आपण बघू काय होतंय. जोपर्यंत काही पूर्णपणे संपत नाही, तोपर्यंत काहीही संपलेलं नसतं. युद्ध ही एक फार क्लिष्ट बाब आहे. खूप साऱ्या वाईट गोष्टी घडू शकतात. पुढचे काही दिवस खूप महत्त्वाचे असतील. इराण अमेरिकेला खूप वर्षांपासून धमकी देत आलेला आहे – डोनाल्ड ट्रम्प
VIDEO | Washington DC: Responding to a press query about Iran, US President Donald Trump (@POTUS ) says, "They (Iran) are 'schoolyard bullies' with bad intentions, cannot have a nuclear weapon." #Iran
— Press Trust of India (@PTI_News) June 18, 2025
(Source: Third Party) pic.twitter.com/dBOvs0jpdo
Donald Trump on Iran: इराणकडे अण्वस्त्र आली, तर जगात फारसे देश उरणार नाहीत – ट्रम्प
मला फक्त एकच गोष्ट हवी आहे. इराणकडे आण्वस्त्र असू शकत नाही. हे मी २० वर्षांपासून बोलत आहे. हे खूप सोपं आहे. इराणकडे अण्वस्त्र असू शकत नाही. यात दुसरा कुठलाच प्रश्न नाहीये. त्यांच्याकडे जर अण्वस्त्र असतील तर जगात फार देश उरणार नाहीत. कारण ते ती अण्वस्त्रं आमच्यावर वापरतील, इतर देशांवर वापरतील. मग जगभरात दहशतवाद असेल. त्यांचा हेतू वाईट आहे. गेल्या ४० वर्षांपासून ते अमेरिका, इस्रायल किंवा त्यांना न आवडणाऱ्या इतर कुणाहीसाठी मृत्यूचीच अपेक्षा ठेवून आहेत – डोनाल्ड ट्रम्प
VIDEO | Washington DC: Responding to a press query about Iran, US President Donald Trump (@POTUS ) says, "They (Iran) are 'schoolyard bullies' with bad intentions, cannot have a nuclear weapon." #Iran
— Press Trust of India (@PTI_News) June 18, 2025
(Source: Third Party) pic.twitter.com/dBOvs0jpdo
Donald Trump on Ayatollah Khomeinei: माझ्या त्यांना शुभेच्छा – डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला बिनशर्त शरणागतीचा दिलेला अल्टिमेटम अयातुल्लाह खोमेनी यांनी धुडकावून लावल्यानंतर ट्रम्प यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. तो देश (इराण) उद्ध्वस्त झालेला आहे. अनेक लोक मारले गेले आहेत. असं व्हायला नको होतं. पण आता त्यांनी चूक केली आहे”, असं ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस येथे माध्यमांना सांगितलं.
VIDEO | Washington DC: Responding to a press query about Iran, US President Donald Trump (@POTUS) says, “I say good luck. The country (Iran) is in ruins. So many people are dead, they shouldn’t have died.”
— Press Trust of India (@PTI_News) June 18, 2025
(Source: Third Party)#Iran #trump
(Full video available on PTI Videos… pic.twitter.com/MnMEZYmdW0
Donald Trump: “मी काय करेन, हे कोणालाही माहिती नाही”, इराणवर हल्ले करण्याबाबत ट्रम्प यांची प्रतिक्रिया
“…तर अमेरिकेला कल्पनातीत परिणाम भोगावे लागतील”, इराणच्या अयातुल्ला खोमेनींची डोनाल्ड ट्रम्पना धमकी
Ayatollah Ali Khamenei: खोमेनींनंतर कोण? पाचजण इराणच्या सर्वोच्च पदाच्या शर्यतीत
Iran-Israel conflict: इराणमधील दोन अणुऊर्जा केंद्रांवर इस्रायलचा हल्ला; सेंट्रिफ्यूज सुविधा उद्ध्वस्त
डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खोमेनी यांना बिनशर्त शरणागतीसाठी अल्टिमेटम दिला होता. पण खोमेनींनी हा अल्टिमेटम फेटाळला आहे. ट्रम्प यांचा हा प्रस्ताव अस्वीकारार्ह असल्याचं खोमेनींनी एका व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून सांगितलं आहे. पीटीआयनं यासंदर्भातला खोमेनींचा व्हिडीओ शेअर केला आहे.
VIDEO | Tehran: Iran’s Supreme Leader Khamenei (@khamenei_ir) rejects US President Donald Trump's surrender ultimatum, calls it ‘unacceptable’.
— Press Trust of India (@PTI_News) June 18, 2025
Source: AFP/PTI
For use in India only pic.twitter.com/UxeKkLZxpW
इस्रायल-इराण युद्धावर रशियानं स्पष्ट केली भूमिका (फोटो – रॉयटर्स)
Israel Iran Battle Highlights, 19 June 2025: वाचा इस्रायल – इराण संघर्षासंदर्भातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी