जेएनयू विद्यार्थ्यांचा नेता कन्हैयाकुमार याने मंगळवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. राहुल गांधी यांच्याशी जवळपास तासभर चर्चा केल्यानंतर कन्हैयाकुमार याने माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलण्यास नकार दिला. एनएसयूआयचे प्रमुख रोजी जॉन यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले.