भारतीय जनता पक्षाचे(भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचा व्हिसा देण्यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देण्यास अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी पुन्हा नकारच दिला.
मोदींच्या व्हिसा विषयावर प्रतिक्रिया दिल्यास भारतातील लोकसभा निवडणुकीमध्ये याचा गैरवापर होण्याच्या भीतीने केरी यांनी नकार दिला आहे. केरी म्हणाले की, नरेंद्र मोदींना व्हिसा देण्यासंदर्भात मी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही आणि याचे कारण भारतातील निवडणुका आहेत. कारण, मी वक्तव्य केले तर याचा वापर किंवा गैरवापर भारतातील लोकसभा निवडणुकीत केला जाऊ शकतो आणि असे होण्याची माझी इच्छा नाही.
भारतातील आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जॉन केरी यांना भारतातील निवडणुकांकडे आणि भाजपकडे कोणत्या दृष्टीने बघता यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते. यावर उत्तरे देताना जॉन केरी यांनी सावधगिरी बाळगली आणि माझ्या कोणत्याही वक्तव्याचे प्रतिबिंब भारतातील लोकसभा निवडणुकीवर पडावे असे वाटत असल्याचेही केरी म्हणले.