इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत जगात सर्वात दिग्गज कंपनी असलेल्या टेस्लाचे सीईओ एलन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत हे तुम्ही सर्वांनीच ऐकलं असेल. मात्र, ३११ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी संपत्ती असणारे एलन मस्क मानवी इतिहासातील पहिले व्यक्ती ठरले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मस्क यांची संपत्ती किती आहे याचा अंदाज केवळ या आकडेवारीवरून तुम्हाला येत नसेल तर एका उदाहरणावरून याचा अंदाज करता येईल. जर तुमचा पगार दरवर्षी १ मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास ७ कोटी ४९ लाख रुपये असेल आणि तुम्ही या पगारातून कधी एक रुपयाही खर्च केला नाही तर एलन मस्क यांच्या एवढी संपत्ती कमवायला तुम्हाला ३ लाख २ हजार वर्षे लागतील, असं मत ग्रॅव्हिटी पेमेंटचे सीईओ डॅन प्राईस यांनी व्यक्त केलंय.

“अब्जावधींचे मालक एलन मस्क यांना केवळ ३.३ टक्केच कर द्यावा लागतो”

एलन मस्क ३.३ टक्के कर देतात. अनेक अब्जाधीशांना ८ टक्के कर द्यावा लागतो. अमेरिकेतील प्रत्येक कुटुंबाला सरासरी १४ टक्के कर द्यावा लागतो, असंही निरिक्षण डॅन यांनी मांडलंय. आपलं म्हणणं पटवून देताना त्यांनी काही अहवालांच्या लिंकही शेअर केल्यात त्यात एलन मस्क यांच्या संपत्तीचं विवरण देण्यात आलंय. एलन मस्क स्पेस एक्स या अंतराळ संशोधन संस्थेचेही प्रमुख आहेत. ही कंपनी नासासोबतही काम करते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know all about how much property tesla ceo elon musk have pbs