Kolkata Rape Case : कोलकात्यातली सरकारी रुग्णालयात झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी आर. जी. कार मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाचे प्राचार्य डॉ. संदीप घोष यांनी सोमवारी सकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला. डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर सरकारी रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजचे प्राचार्य टीकेचे धनी बनले होते. तसंच, इतर डॉक्टरांनी संप पुकराल. अशा घटना पुन्हा घडू नये, याकरता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भातल हिंदूस्थान टाईम्सने वृत्त दिलं आहे.

३१ वर्षीय डॉक्टरचा मृतदेह शुक्रवारी (९ ऑगस्ट) सकाळी रुग्णालयातील सेमिनार हॉलमध्ये मृतावस्थेत आढळला होता. चौकशी अहवालानुसार, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहावर अनेक जखमा दिसत होत्या. तसेच मृतदेहावर अर्धवट कपडे होते. या घटनेमुळे रुग्णालयामधील कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला असून सखोल चौकशीच्या मागणीसाठी अनेक डॉक्टरांनी काम बंद केलं आहे. शनिवारी इतर वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरही या आंदोलनात सहभागी झाले. दरम्यान, पोलिसांनी आरोपी संजय रॉय याला रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज व इतर पुराव्यांच्या आधारे अटक केली आहे.

हेही वाचा >> Kolkata Doctor Murder : डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून खून; इयरबड्सच्या तुकड्यामुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

डॉक्टरच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय म्हटले आहे?

प्राथमिक पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिच्या डोळ्या, नाक आणि प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव होत असल्याचं समोर आलं आहे. तिची मानही तुटलेली आढळून आली. तिच्या शरीराच्या इतर भागावरही जखमा होत्या.

दरम्यान, सोमवारी पश्चिम बंगालमधील रुग्णालय सेवा विस्कळीत झाली कारण ज्युनियर डॉक्टर, इंटर्न आणि पदव्युत्तर प्रशिक्षणार्थींनी सलग चौथ्या दिवशी संप सुरू ठेवला, एका महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येचा निषेध केला आणि तिच्या मृत्यूची दंडाधिकारी चौकशीची मागणी केली. तसंच, रुग्णालयाचे प्राचार्य डॉ. संदीप घोष यांच्यावरही टीका होत होती. अखेर त्यांनी राजीनामा दिला. याबाबत त्यांनी माध्यमांना प्रतिक्रियाही दिली आहे.

प्राचार्यांनी काय दिली प्रतिक्रिया?

“सोशल मीडियावर माझी बदनामी होत आहे. याप्रकरणात ज्या मुलीचा मृत्यू झाला ती माझ्या मुलीसारखी आहे. त्यामुळे पालक असल्याच्या नात्याने मी राजीनामा देत आहे. असे प्रकार भविष्यात कधीच घडू नयेत असं वाटतं. तिला वाचवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला. पण आमच्या चेस्ट विभागात तिचा मृत्यू झाला”, असं डॉ. संदीप घोष म्हणाले.