Delhi High Court Lawyer Viral Video: दिल्ली उच्च न्यायालयाच्या व्हर्च्युअल सुनावणी दरम्यान एक अजब प्रसंग घडला आहे. सुनावणी सुरू असताना एका वकिलाने महिलेला किस केलं. ही घटना मंगळवारी घडली. ऑनलाईन सुनावणी सुरू होण्यासाठी काही वेळ बाकी होता. सर्व लोक न्यायमूर्ती येण्याची वाट पाहत असताना सदर प्रकार घडला.
सुनावणी आधी काय होते?
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, वकील आपल्या कार्यालयात कोट घालून बसले आहेत. वकील सुनावणीसाठी तयार असतानाच एक महिला अचानक व्हिडीओमध्ये येते. तेव्हा वकील त्या महिलेच्या हाताला पकडून तिला स्वतःजवळ खेचण्याचा प्रयत्न करतात. सदर महिला जवळ येण्यास तयार नसते, तेवढ्यात वकिल तिला खेचून तिच्या गालावर किस करतात. यानंतर लगेचच महिला मागे हटते आणि निघून जाते.
या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सदर घटनेमधील वकील आणि महिलेची ओळख उघड करण्यात आलेली नाही. तसेच हा व्हिडीओ कोणत्या उद्देशाने रेकॉर्ड करण्यात आला, याचीही माहिती बाहेर आलेली नाही.
पाहा व्हिडीओ –
Welcome to Digital India Justice ?
— ShoneeKapoor (@ShoneeKapoor) October 15, 2025
Court is online… but judge forgot it’s LIVE! ☠️
When tech meets tradition
— and the camera off button loses the case! ? pic.twitter.com/1GbfOFQ6w7
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओची चर्चा
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच अनेकांनी वकिलाच्या वर्तनाचा निषेध केला आहे. ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे, असे एका युजरने लिहिले.
दिल्ली उच्च न्यायालयातील सुनावणी आजकाल करमणुकीचा विषय बनली आहे. गंभीर निकालापासून ते कोर्टरूममधील नाट्य, असे दररोज काहीना काही घडत आहे. जर हेच सर्व करायचे होते, तर वकील बनण्याची गरज तरी काय होती?, अशी कमेंट एका युजरने केली आहे.
न्याय कदाचित आंधळा असेल पण आता तो म्यूटही असतो आणि चुकून त्याचा कॅमेराही सुरू असतो, अशी मजेशीर प्रतिक्रिया दुसऱ्या एका युजरने दिली आहे.