अदाणी समूह प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला होता. याच प्रकरणी आता राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाने नोटीस बजावली आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत नोटीशीला उत्तर देण्यास लोकसभा सचिवालयाने सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपा नेते निशिकांत दुबे आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राहुल गांधी यांच्यावर विशेषाधिकाराचा भंगचा आरोप केला होता. त्याप्रकरणी लोकसभा सचिवालयाकडे तक्रार नोंद केली होती. त्यानुसार लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस जारी केली आहे.

हेही वाचा : अमेरिका-कॅनडा सीमेवर हेरगिरी? हवाई दलाने पाडलं चौथं फ्लाईंग ऑब्जेक्ट, बायडेन आक्रमक

खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींच्या भाषणावर विशेषाधिकार भंगाची नोटीस जारी केली होती. तसेच, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहित नियम ३८० नुसार राहुल गांधींच्या भाषणातील असंसदीय, असन्माननीय आरोप लोकसभेच्या कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली होती.

हेही वाचा :

राहुल गांधी काय म्हणाले होते?

राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर उत्तर देताना राहुल गांधींनी अदाणी प्रकरणावरून पंतप्रधान मोदींवर टीकास्र सोडलं. “मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर जाऊन येतात आणि संरक्षण क्षेत्रातील अनेक कंत्राटे अदानींच्या कंपन्यांना मिळतात. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना देशातील उद्योगजगत त्यांच्या विरोधात होते. त्या काळात अदानी मोदींच्या पाठीशी उभे राहिले. तेव्हा त्यांचे नाते स्थानिक होते, मग गुजरातव्यापी झाले. मोदी पंतप्रधान झाल्यावर हे नाते राष्ट्रीय झाले, आता तर ते आंतरराष्ट्रीय झाले आहे,” असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha secretariat notice congress leader rahul gandhi remarks on prime minister narendra modi ssa