हरिद्वार येथील कुंभ मेळ्यात मध्यप्रदेशहून आलेले निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे करोना संसर्गामुळे निधन झाले आहे. प्राप्त माहितीनुसार, महामंडलेश्वर कपिल देव हे करोनाबाधित असल्याचे आढळल्यावर त्यांना देहरादून येथील कैलाश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणीच त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“हरिद्वारच्या कुंभमेळ्याने करोनाचा अणुबॉम्बच फोडला”

हरिद्वारमध्ये कुंभ मेळ्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे मोठ्याप्रमाणावर उल्लंघन झाले. हरिद्वारमध्ये कुंभ मेळ्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे मोठ्याप्रमाणावर उल्लंघन झाले होते. मागील ७२ तासांमध्ये दीड हजारांहून अधिक पॉझिटिव्ह केसस केवळ हरिद्वार कुंभ मेळा परिसरातू समोर आल्या आहेत. शिवाय अनेकांचा मृत्यू देखील झालेला आहे. करोनाबाधितांची संख्या आता आणखी वाढण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे.

लाखोंचे शाहीस्नान; करोना निर्बंध धाब्यावर

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचा दिलेला इशारा धुडकावून बुधवारी हजारो साधूंनी हरिद्वारमधील हर की पैरी येथे गंगा नदीत कुंभमेळ्यातील तिसरे शाहीस्नान केले. सामाजिक अंतराच्या नियमांची पायमल्ली करून दुसऱ्या शाहीस्नानालाही साधूंसह अन्य भाविकांनी गर्दी केली होती.

कुंभमेळ्यात करोनाचा शिरकाव; हरिद्वारमध्ये दोन दिवसांत हजार जणांना संसर्ग

ना मास्क, ना थर्मल स्क्रिनिंग

इंडियन एक्स्प्रेसनं कुंभमेळा सुरू असलेल्या परिसरात करोना नियमांच्या पालनाबद्दलची पाहणी केली. तेव्हा तिथे कुठेही मास्कची सक्ती करताना आढळून आलं नाही. रेल्वे स्टेशन आणि इतर चेक पॉईंटच्या ठिकाणी थर्मल स्क्रिनिंगही केलं जात नसल्याचं दिसलं. महत्त्वाचं म्हणजे कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी आरटी-पीसीआरचा निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा करण्यात आलेला नाही. मात्र, विविध तपासणी नाक्यांवर केलेल्या पाहणी रिपोर्ट न आणलेल्यांनाही परवानगी देण्यात आल्याचं दिसून आलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahamandleshwar kapil dev of nirvani akhada who participated in kumbh mela passed away due to corona msr