एका ३३ वर्षीय महिलेने अशी तक्रार नोंदवली आहे की ती जेव्हा रात्री तिच्या श्वानाला फेरी मारण्यासाठी घेऊन गेली होती तेव्हा तिच्याकडे पाहून एका तरुणाने हस्तमैथुन करण्यास आणि अश्लील इशारे करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला या महिलेचं त्या तरुणाकडे लक्ष गेलं नाही पण तो मॅडम, मॅडम अशा हाका मारु लागला आणि त्यानंतर तिला धक्काच बसला. तिने धावत जाऊन आधी घर गाठलं आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी अज्ञात तरुणाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

नेमकी कुठे घडली ही घटना?

ही घटना बंगळुरुतल्या इंदिरा नगर भागात १ नोव्हेंबरला घडली आहे. महिलेने तिचा विनयभंग झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली. लाज वाटेल असं कृत्य त्या पुरुषाने केलं असं पोलिसांना या महिलेने सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला तिच्या श्वानासह रस्त्यावरुन चालली होती. तेव्हा हा अनोळखी तरुण तिला पाहून हस्तमैथुन करु लागला. या महिलेला सुरुवातीला काही लक्षात आलं नाही. मात्र नंतर त्याने तिला मॅडम मॅडम अशा हाका मारल्या. त्यावेळी या महिलेने मागे वळून पाहिलं तेव्हा हा तरुण हस्तमैथुन करत तिच्याकडे पाहून अश्लील इशारे करत होता.

घडल्या प्रकारानंतर महिला चांगलीच घाबरली

घडल्या प्रकारानंतर महिला चांगलीच घाबरली आणि तिने आधी घर गाठलं आणि त्यानंतर थेट पोलीस ठाणं गाठलं. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात तरुणाविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे. या महिलेने घडला प्रकार तिच्या बहिणीला आणि मैत्रीणीला सांगितला. त्यानंतर या तिघी पोलीस ठाण्यात आल्या होत्या आणि त्यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. भारतीय न्याय संहितेच्या कलम ७५ च्या अंतर्गत अज्ञात तरुणाविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. तसंच बंगळुरु पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे काही छडा लागतो आहे का? हे देखील तपासत आहेत. पीटीआयने हे वृत्त दिलं आहे.