Man puts explosive in lovers mouth and sets it off Crime News : कर्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यातील एका गावात एक अत्यंत भयानक गुन्हा घडल्याची माहिती समोर आली आहे. येथे एका २० वर्षीय विहाहित महिलेची तिच्या प्रियकराने अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरोपीने या महिलेच्या तोंडात स्फोटके ठेवून त्याचा स्फोट घडवून आणल्याचा प्रकार समोर आली आहे. या भीषण प्रकारानंतरचा व्हिडीओ समोर आला असून यामध्ये महिलेचा मृतदेह एका बेडवर पडलेल्या आवस्थेत दिसून आला. या स्फोटानंतर त्िच्या चेहऱ्याचा खालचा भाग पूर्णपणे उडाल्याचे पाहायला मिळाले. तर जमिनीवर सर्वत्र रक्त पसरले होते.

या पीडित महिलेचे नाव रक्षिता असे असून ति हुनुसूर तालुक्यातील गेरसनाहल्ली गावातील रहिवासी आहे. तिचा मृतदेह सापडला ती भेरया गावातील एका लॉजमधील खोली आहे. या ठिकाणी ही महिला तिचा प्रियकर सिद्धराजूसोबत आली होती.

या महिलेचा विवाह केरळमधील एका मजूराबरोबर झालेला होता आणि ती तिचा नातेवाईक असलेल्या सिद्धराजू याच्याबरोबर अवैध संबंधांमध्ये होती.

लॉजवर गेल्यानंतर या जोडप्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि त्यानंतर त्या व्यक्तीने कथितपणे स्फोटक पदार्थ तिच्या तोंडात घातले आणि खाणीत जिलेटीन कांड्याचा स्फोट करण्यासाठी वापरल्या जाण्याऱ्या ट्रिगरने त्याचा स्फोट घडवून आणला, असे पोलिसांनी सांगितले.

या घटनेनंतर आरोपीने महिलेचा मृत्यू मोबाईलच्या स्फोटामुळे झाल्याचे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना स्थानिकांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटली आणि सालिग्रामा पोलिसांनी सिद्धराजूला याला ताब्यात घेतले. दरम्यान सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.