दिल्लीसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच एरव्ही कायम असणारी मतांची टक्केवारी घटल्याने चिंतेत असल्याने बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी आता लोकसभा निवडणुकीसाठी जुळवाजुळव सुरू केली आहे. दिल्ली विधानसभेच्या मागील निवडणुकीत चौदा टक्के मते घेणाऱ्या बसपकडे यंदा मतदारांनी पाठ फिरवत ‘आप’ला साथ दिल्याने मायावती चिंतेत आहेत. त्यामुळे येत्या १५ जानेवारीला लखनौमघ्ये होणाऱ्या सभेत काँग्रेसशी कोणत्याही परिस्थितीत युती करणार नसल्याची घोषणा करून पारंपरिक दलित मतदाराला मायावती साद घालणार आहेत.
मायावती काँग्रेसशी युती करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याने बसपच्या मतदारांमध्ये संभ्रम पसरला आहे.
गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत बसपची मतांची टक्केवारी सातत्याने वाढत होती. यंदा मात्र बसपचे उमेदवार सपशेल आपटले.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या वाढत्या लोकप्रियतेला आम आदमी पक्षाचा अपशकुन झाल्याने बसप गोटात समाधानकारक वातावरण होते. मात्र दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत पारंपरिक मतदारांनी ‘आप’चा पर्याय निवडल्याने बसपचे धाबे दणाणले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mayawati rules out alliance with congress