सध्याची जगातील अग्रगण्य सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर शेरील सॅंडबर्ग यादेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चाहत्या आहेत. सॅंडबर्ग यांनी गुरुवारी मोदी यांची भेट घेतली. त्यापूर्वी बुधवारी नवी दिल्लीत निवडक पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपणही मोदींच्या चाहत्या असल्याचे सांगितले.
फेसबुकवर मोदी जगातील दुसऱया क्रमांकाचे सर्वात लोकप्रिय नेते आहेत. त्यांचे फेसुबकवर तब्बल १८ कोटी चाहते आहेत. यामध्ये पहिल्या क्रमांकावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आहेत. मोदी यांनी निवडणुकीतील विजयानंतर आपल्या आईचा आशीर्वाद घेतल्याचे छायाचित्र फेसबुकवर टाकले होते. त्यांच्या या फोटोचे सॅंडबर्ग यांनी कौतुक केले.
सरकार आणि नागरिक यांच्यामध्ये संवाद साधण्यासाठी आणि प्रशासनासाठी फेसबुकचा चांगला वापर होऊ शकतो, असे मोदी यांनी सॅंडबर्ग यांची भेट घेतल्यानंतर म्हटले आहे. लोकांशी थेट संवाद साधणे हे प्रशासनाच्या दृष्टीने काहीसे अवघड असते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. परदेशी पर्यटक भारतात आणण्यासाठी फेसबुकचा कसा वापर होऊ शकतो, याबाबतही सॅंडबर्ग यांच्याशी बोलणे झाल्याचे मोदी यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jul 2014 रोजी प्रकाशित
फेसबुकच्या सीओओ मोदींच्या चाहत्या; नवी दिल्लीत घेतली भेट
सध्याची जगातील अग्रगण्य सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर शेरील सॅंडबर्ग यादेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चाहत्या आहेत.

First published on: 03-07-2014 at 04:27 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi says facebook a tool for governance better interaction