मुस्लिम समाजाने भारतीय जनता पक्षाबद्दल(भाजप) कोणतीही भिती बाळगण्याची गरज नाही. भाजप प्रणित राज्यांमध्ये सध्या कोणत्याही दंगली झालेल्या नाहीत. समाजात काहींकडून भाजपला मुस्लिम विरोधी असल्याचे ठरविण्याचे भाबडे प्रयत्न सुरू आहेत असे भाजप नेते मुरली मनोहर जोशी यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, “भाजपचे सरकार असलेल्या मध्यप्रदेश, राजस्थान, गोवा, छत्तीसगड या राज्यांमध्ये दंगली झालेल्या नाहीत. त्यामुळे मुस्लिम समाजाने भाजपबद्दल अजिबात भय बाळगू नये. राज्यात दंगलींसारख्या घटना होणार नाहीत याची काळजी घेणारा भाजप पक्ष आहे. देशाने अटलबिहारी वाजपेयींच्या रूपात भाजपचा पंतप्रधानही पाहिला आहे. त्यांच्या नेतृत्व काळातही कोणत्याही प्रकारच्या जातीय दंगली झालेल्या नाहीत. त्यामुळे भाजप सरकार मुस्लिम विरोधी ठरेल असे दावा करणाऱयांची फक्त बडबड सुरू आहे मूळात त्यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही.” असेही ते पुढे म्हणाले. तसेच देशात भाजपचे  सरकार आल्यास देशातील मुस्लिमांची सुरक्षितता आणि दंगलींसारखे प्रकार न होऊ देणे यावर भाजपचा भर राहील. असेही जोशी म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Muslims should not fear bjp murli manohar joshi