नरेंद्र मोदी हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते

कॅनडाचे अध्यक्ष जस्टिन ट्रुडो यांना ४३ टक्के, तर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना ४१ टक्के रेटिंग मिळाले आहे.

जगभरातील लोकप्रिय नेत्यांच्या जागतिक मानांकनात (ग्लोबल रेटिंग ) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ७१ टक्के गुणांसह (अ‍ॅप्रूव्हल रेटिंग) अव्वल ठरले आहेत  १३ जागतिक नेत्यांच्या यादीत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन हे ४३ टक्के रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांच्यानंतर कॅनडाचे अध्यक्ष जस्टिन ट्रुडो यांना ४३ टक्के, तर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना ४१ टक्के रेटिंग मिळाले आहे.

 ‘मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्स’ या संकेतस्थळाने मे २०२० मध्ये मोदी यांना ८४ टक्क्यांचे सर्वाधिक रेटिंग दिले होते. मे २०२१ मध्ये ते ६३ टक्क्यांवर आले. नोव्हेंबर २०२१ मध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही सर्वाधिक लोकप्रिय जागतिक नेत्यांच्या यादीत अग्रस्थानी होते.

 हे संकेतस्थळ सध्या ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन, ब्रिटन व अमेरिका या देशांतील नेत्यांच्या ‘अ‍ॅप्रूव्हल र्रेंटग’ चा मागोवा घेत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Narendra modi is the most popular leader in the world approval rating global rating akp

Next Story
भारतात येणाऱ्या विदेशी प्रवाशांचेही आता गृह विलगीकरण
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी