महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नाही त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आल्याचा निर्वाळ देत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चव्हाणांच्या उमेदवारीचे समर्थन केले. त्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर पत्रकारपरिषदेत बोलत होत्या.
सोनिया म्हणाल्या की, अशोक चव्हाणांवर कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नाही त्यामुळे निवडणूक आयोगानेही त्यांना अपात्र ठरवलेले नाही, त्यामुळे निवडणूक लढविण्यास ते पात्र आहेत.
‘आदर्श’ चौकशी अहवाल पहिल्यांदा फेटाळणे, राहुल गांधी यांनी डोळे वटारताच अहवाल स्वीकारणे पण त्यात अशोक चव्हाण अडचणीत येणार नाहीत अशी खबरदारी घेणे, ‘सीबीआय’ने भूमिका बदलणे यावरून काँग्रेस नेतृत्वाने अशोकरावांच्या मागे ताकद उभी केल्याचे स्पष्ट होते. गांधी घराण्यावर असलेली निष्ठा त्यांच्या कामी आली आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
अशोकरावांच्या मदतीसाठी दिल्लीचीच पाऊले