Nobel Prize 2024 : वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक २०२४ च्या पुरस्कारांची घोषणा आज (७ आक्टोंबर) करण्यात आली आहे. अमेरिकेचे व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन हे या नोबेल पारितोषिक २०२४ च्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. मायक्रो आरएनएच्या (microRNA) शोधाबद्दल व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
शास्त्रज्ञ व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना या वर्षीचे नोबेल पारितोषिक हे मायक्रोआरएनए या सूक्ष्म रेणूच्या शोधाबद्दल प्रदान करण्यात आले आहे. जे जनुकांच्या क्रियाकलापांचे नियमन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. जरी आपल्या शरीरातील सर्व पेशींची जनुके सारखीच असली तरी, स्नायू आणि चेतापेशी यांसारख्या विविध प्रकारच्या पेशींची कार्ये वेगवेगळी असतात, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं.
BREAKING NEWS
The 2024 #NobelPrize in Physiology or Medicine has been awarded to Victor Ambros and Gary Ruvkun for the discovery of microRNA and its role in post-transcriptional gene regulation. pic.twitter.com/rg3iuN6pgY— The Nobel Prize (@NobelPrize) October 7, 2024
हेही वाचा : Zakir Naik : “इस्लामवर आरोप करतेयस, आत्ताच्या आत्ता…”, पाकिस्तानी तरुणीच्या प्रश्नावर झाकीर नाईक संतापला
दरम्यान, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी या क्षेत्रातील नोबेल पारितोषिकाची घोषणा आधी करण्यात आली आहे. तसेच ७ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर या दरम्यान अर्थशास्त्र, साहित्य, शांतता, विज्ञान अशा क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या लोकांना नोबेल पारितोषिकाची घोषणा करण्यात येणार आहे. हे पुरस्कार स्टॉकहोम, स्वीडन या ठिकाणी दिले जाणार आहेत.
मागील वर्षी कोणाला मिळाले होते नोबेल?
गेल्या वर्षी नोबेल पारितोषिक हे कॅटालिन कॅरिको आणि ड्र्यू वेइसमन यांना मिळाले होते. त्यावेळी नोबेल पारितोषिकाची घोषणा करणाऱ्या समितीने सांगितलं होतं की, कॅटालिन कॅरिको आणि ड्र्यू वेइसमन यांनी एमआरएनए तंत्रज्ञानाच्या साह्याने बनवलेल्या कोरोना लसीमुळे जग कोरोना महामारीतून बाहेर येऊ शकले. त्यावेळी कोविडच्या विरुद्ध प्रभावी ठरलेली एमआरएनए लस विकसित करणे शक्य झाले होते.