NSAs of India and Pakistan in Touch : एकीकडे भारताने पाकिस्तानातील दहशतवादाविरोधात ल ष्करी कारवाया सुरू केलेल्या असताना त्यांना राजनैतिक मार्गही खुले ठेवले आहेत. म्हणजेच, दोन्ही देशांमधील तणाव आणि संघर्ष कमी होण्याकरता भारताने पाकिस्तानबरोबर संपर्क ठेवला आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल असीम मलिक एकमेकांच्या संपर्कात असल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
म्हणजेच, दोन्ही देशांदरम्यान तणाव असला तरीही देशातील संघर्ष कमी करण्याकरता राजनैतिक मार्ग खुले असल्याचंही इंडियन एक्स्प्रेसने वृत्तात म्हटलं आहे. इस्लामाबादमधील भारतीय चार्ज डी अफेयर्स गीतिका श्रीवास्तव इस्लामाबादमधील प्रमुख संवादकांच्या संपर्कात आहेत.
अमेरिकाही दोन्ही देशांच्या संपर्कात
पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने केलेल्या हल्ल्यांबद्दल निषेध करण्यासाठी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने गीतिका श्रीवास्तव यांना बुधवारी समन्स बजावले होते. तर, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मार्को रुबियो यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी याविषयावर चर्चा केली. त्यामुळे हे दोन्ही देश एकमेकांच्या संपर्कात असल्याचं मार्को म्हणाले असल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे. परंतु, एका उच्चपदस्थ भारतीय अधिकाऱ्याने सांगितले की, “संपर्कात असणे म्हणजे चर्चेत असणे असे नाही.”
पहलगामच्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांना लक्ष्य केलं होतं. त्यामुळे या हल्ल्यानंतर भारताने देशात हाय अलर्ट जारी केला आहे. देशभर ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून पाकिस्तानच्या संभाव्य कुरापतींविरोधात रणनीती आखण्यात आली आहे.
दोन्ही देश संपर्कात, परराष्ट्रमंत्र्यांची स्पष्टोक्ती
पाकिस्तानने अलिकडेच आयएसआयचे डीजी लेफ्टनंट जनरल असीम मलिक यांची एनएसए (राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार) म्हणून नियुक्ती केली आहे. तसंच, हो दोन्ही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एकमेकांच्या संपर्कात असल्याचं पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी अधिकृतपणे स्पष्ट केलं आहे.