अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणार- अमित शहांचे वक्तव्य
आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने(भाजप) पुन्हा एकदा राम मंदिर उभारण्याचा मुद्दा समोर आणला आहे. उत्तरप्रदेशातील भाजपचे प्रभारी व सरचिटणीस अमित शहा यांनी भाजप लवकरच अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणार असल्याचे म्हटले. नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय समजले जाणारे अमित शहा पक्षाच्या बैठकीसाठी अयोध्यात आले होते. त्यावेळी अमित शहा म्हणाले, “बैठकीआधी प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी मी येथे आलो आहे. देशाला काँग्रेसमुक्त करण्याची प्रार्थना मी केली आहे.” त्याचबरोबर “आम्ही सर्व मिळून लवकरच येथे भव्य राम मंदिर उभारू” असेही अमित शहा म्हणाले. शहा यांच्या या वक्तव्यामुळे भाजप पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा पुढे करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On visit to ayodhya amit shah targets congress rakes up ram temple issue