पठाणकोट हल्लाप्रकरणी ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या काही सदस्यांना पाकिस्तानकडून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच पठाणकोट हल्ल्याचा तपास करण्यासाठी पाकिस्तान आपले तपास पथक भारतात पाठवणार असल्याचेही समजते.
पठाणकोटचे वास्तव
तत्पूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी संयुक्त तपास पथक नेमले असून, भारताने सुपूर्द केलेल्या धागेदोऱयांवरून तपास करण्याचे आदेश या पथकाला देण्यात आले आहेत. पाकिस्तानी यंत्रणांनी दोन दिवसांपूर्वी गुजरानवाला, झेलम आणि बहावलपूर येथे पठाणकोट हल्ल्यासंदर्भात छापे टाकले होते. यात काही जणांना ताब्यात घेण्यात आले होते. शरीफ यांनी याआधीच पठाणकोट हल्ल्याच्या तपासात पारदर्शकता राहिल याचे आश्वासन दिले आहे, तर भारताने पठाणकोट हवाई तळावरून हल्लेखोराकडून संपर्क साधण्यात आलेला पाकिस्तानी दुरध्वनी क्रमांक पाककडे सुपूर्द केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan arrests jaish e mohammad men accused in pathankot attack