Pakistan: इम्रान खान यांची मोठी घोषणा, देशातील सर्व विधानसभा जागांवर राजीनामा देण्याचा 'पीटीआय'चा निर्णयPakistan Former PM and PTI chief Imran Khan announced that his party has decided to quit all legislative assemblies in the country | Loksatta

पाकिस्तानमध्ये राजकीय भूकंप, इम्रान खान यांच्या पक्षाचे सर्व मुख्यमंत्री, आमदार, खासदार राजीनामा देणार!

“आपल्या देशाचे नुकसान करण्याऐवजी ही भ्रष्ट व्यवस्था सोडून जाणेच योग्य आहे”, असे खान यांनी म्हटले आहे

पाकिस्तानमध्ये राजकीय भूकंप, इम्रान खान यांच्या पक्षाचे सर्व मुख्यमंत्री, आमदार, खासदार राजीनामा देणार!
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (संग्रहित फोटो)

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि ‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ’ पक्षाचे (पीटीआय) प्रमुख इम्रान खान यांनी एक मोठी घोषणा केली आहे. विधीमंडळातील ‘पीटीआय’च्या सर्व जागा सोडण्याचा निर्णय खान यांनी जाहीर केला आहे, असं वृत्त पाकिस्तानच्या ‘एक्स्प्रेस ट्रिब्यून’ने दिले आहे. देशात लवकरात लवकर निवडणूक घेण्यास सत्ताधाऱ्यांना भाग पाडण्यासाठी खान यांच्याकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.

रावळपिंडीत झालेल्या जाहीर सभेत सर्व जागांचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं इम्रान खान यांनी सांगितलं आहे. ७० वर्षी इम्रान खान यांनी या जागा सोडण्याबाबत राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. पक्षाच्या संसदीय समितीच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे. “आपल्या देशाचे नुकसान करण्याऐवजी ही भ्रष्ट व्यवस्था सोडून जाणेच योग्य आहे”, असे खान यांनी म्हटले आहे.

Asia Cup 2023: ‘…तर भारताला पाकिस्तानशिवाय विश्वचषक खेळावा लागेल!’ रमीझ राजा यांनी पुन्हा एकदा ओकली गरळ

पक्षाचा ‘हकेकी आझादी’ मोर्चा इस्लामाबादच्या दिशेने जाणार नाही, असेही खान यांनी स्पष्ट केले आहे. देशात अराजकता माजू नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे. “आम्हीही श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण करू शकलो असतो. पण इस्लामाबादचा मोर्चा सरकारला परवडणारा नाही. ते लाखो लोकांना इस्लामाबादमध्ये प्रवेश करण्यापासून रोखू शकत नाहीत. जर दंगली भडकल्या तर परिस्थिती सर्वांच्याच हाताबाहेर जाईल. त्यामुळे देशात अराजकता माजेल, असं कुठलंही पाऊल मला उचलायचं नाही”, असं खान म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 08:19 IST
Next Story
UP Crime: कानपूरमध्ये शिक्षकाने गाठली क्रौर्याची सीमा, दोनचा पाढा विसरल्यानं विद्यार्थिनीच्या हातावर…