Pakistan-Occupied Kashmir Biggest protests in years against shehbaz sharif govt : पाकिस्तान व्याप्त काश्मीर (Pok) मध्ये गेल्या काही वर्षांमधील सर्वात मोठ्या आंदोलनांपैकी एक सध्या सुरू आहे. अवामी अॅक्शन कमिटी (AAC) ने या भागात सोमवारी मोठ्या प्रमाणावर निदर्शने सुरू केली आहेत. एएसीने केलेल्या बंद आणि चक्का जामच्या आवाहनानंतर या भागातील तणाव कमालीचा वाढला आहे. हे आंदोलन अनिश्चित काळापर्यंत चालण्याची शक्यता आहे. ज्यामुळे पाकिस्तान सरकारला या भागात मोठ्या संख्येने सुरक्षा दलांना तैनात करणे भाग पडले. या बंदच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारने मध्यरात्रीपासून इंटरनेट सेवा बंद केली असून नागरिकांना एकत्र गोळा होण्यावर देखील बंधने घालण्यात आली आहेत.
शाहबाज शरीफविरोधात आंदोलन का?
डॉन (Dawn)ने दिलेल्या वृत्तानुसार, एएसी आणि स्थानिक प्रशासन यांच्यातील चर्चा फिसकटल्यानंतर ही निदर्शने केली जात आहेत. ज्यामुळे एएसीने अनेक दशकांपासून नाकारण्यात आलेल्या मूलभूत हक्कांसाठी मोठे आंदोलन करण्याचे लोकांना आवाहन केले.
रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील संपूर्ण प्रदेशात पाळण्यात आलेला बंद हा ‘आता खूप झाले’ असा स्पष्ट आणि कडक संदेश देण्यासाठी आहे. या आंदोलनात निदर्शक हे त्यांच्या हक्कांची मागणी करत आहेत आणि यावेळी सरकारने कृती करवी किंवा लोकांच्या संतापाला सामोरे जावे असा थेट इशारा आंदोलकांनी दिला आहे. डॉनने म्हटले आहे की, लॉकडाउन हा तर फक्त प्लॅन A आहे आणि अलायन्सने B, C, D असे प्लॅन देखील तयार ठेवले आहेत.
पाकिस्तान प्रशासनाने अद्याप कोणतीही योजना जाहीर केलेली नाही, पण रिपोर्टनुसार कडक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. डॉनच्या रिपोर्टनुसार, सशस्त्र पोलीस आणि निमलष्करी दलाच्या मोठ्या ताफ्यांनी शनिवार, २७ सप्टेंबर रोजी या भागातील बहुतांश प्रमुख शहरांमधून फ्लॅग मार्च काढले. तसेच शहरांचे प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणांवर मोठा सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याबरोबरच महत्त्वाच्या ठिकाणांवर कडक देखरेख ठेवली जात आहे.
या भागात सरकारच्या धोरणांविरोधात सतत आंदोलने केली जातात, ज्यामध्ये स्थानिक लोकांकडून प्रशासनाला आर्थिक दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जातो. माध्यमांमध्ये देण्यात आलेल्या वृत्तानुसार, जून महिन्यात गिलगिट-बाल्टिस्तानमधील हजारो लोकांनी शाहबाज शरीफ सरकारच्या व्यापार धोरणांना विरोध करत कराकोरम महामार्ग (Karakoram Highway) अनेक दिवस रोखून ठेवला होता. चीन-पाकिस्तान इकॉनॉमीक कॉरिडॉर (CPEC) मधून इस्लामाबादला बीजिंगशी जोडणारा एक महत्त्वाचा महामार्ग आहे. यापूर्वी मे महिन्यात जमीन आणि मिनरल्स बळकावण्याची परवानगी देणाऱ्या विधोयकाविरोधात तसेच वीज टंचाईच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. त