दिल्लीत चार वर्षांच्या मुलीवर तिच्या ट्यूशनच्या ठिकाणी बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. ही मुलगी ज्या ठिकाणी ट्यूशनला जाते तिथल्या ३४ वर्षीय अल्पसंख्याक तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पांडव नगरमध्ये आज मोठ्या प्रमाणावर लोक जमा झाले होते. त्यांनी तोडफोड केली आहे तसंच घोषणाबाजीही केली आहे. या ठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आलं आहे.
नेमकी काय घडली घटना?
३४ वर्षीय अल्पसंख्याक तरुणाला अटक करण्यात आली आहे. चार वर्षांच्या मुलीवर या तरुणाने बलात्कार केला. दिल्लीचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सागर सिंग यांनी ही घटना शनिवारी घडल्याचं सांगितलं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आम्ही ३४ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. तसंच मुलीवर उपचार सुरु आहेत आणि तिची प्रकृती स्थिर आहे असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
हे ही वाचा- नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी; दुकान मालकाचा महिलेवर बलात्कार
आज पांडव नगरमध्ये काय घडलं?
४ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आल्यानंतर पांडव नगर भागात जमाव संतप्त झाला. या जमावाने या ठिकाणी कार आणि इतर भागांची तोडफोड केली. यानंतर या ठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी हे म्हटलं आहे घडलेल्या घटनेबद्दल काही अफवा पसरवण्यात आल्या ज्यामध्ये मुलीची प्रकृती गंभीर आहे असं सांगण्यात आलं. या अफवांवर विश्वास ठेवून काही लोकांनी तोडफोड केली. मात्र मी हे आवाहन करते आहे की कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. दिल्ली पूर्व भागाच्या डीसीपी अपूर्वा गुप्ता यांनी हे आवाहन नागरिकांना केलं आहे. मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिची वैद्यकीय तपासणी झाली आहे आणि तिची प्रकृती स्थिर आहे अशीही माहिती त्यांनी दिली.