PM Modi praise Donald trump welcome release all hostages after israel gaza ceasefire : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध संपुष्टात आले आहे. हमासने इस्रायलच्या ओलीस ठेवलेल्या २० नागरिकांना सोडून दिले आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व ओलिसांच्या सुटकेच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. भारत या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रामाणिक प्रयत्नांचे समर्थन करतो असे मोदी म्हणाले आहे.
ट्रम्प यांच्या गाझा शांतता प्रस्तावाच्या पहिल्या टप्प्याचा भाग म्हणून हमासने दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून बंधनात ठेवलेल्या इस्रायली ओलीसांना सोमवारी मुक्त केले आहे. त्यानंतर अखेर हे जिवंत इस्रायलमध्ये परतले आहेत. या युद्धविरामानंतर अखेर दोन वर्ष चाललेले युद्ध थांबले आहे.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
पंतप्रधान मोदींनी हजारो लोकांचे प्राण घेणाऱ्या या युद्धाच्या समाप्तीनंतर सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. “दोन वर्षांहून अधिक काळ बंदिवासात असलेल्या सर्व ओलिसांच्य सुटकेचे आम्ही स्वागत करतो,” असे पंतप्रधान मोदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत. “त्यांची सुटका ही त्यांच्या कुटुंबीयांच्या धाडसाला, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या अविचल शांतता प्रयत्नांना आणि पंतप्रधान नेतान्याहू यांच्या मजबूत निर्धाराला केलेले अभिवादन आहे. या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्याच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना आमचा पाठिंबा आहे,” असेही पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
सोमवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि हमासमधील युद्ध संपल्याची अधिकृत घोषणा केली. पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी युद्धबंदी कायम राहील असा विश्वास व्यक्त केला शुक्रवारी सकाळी युद्धबंदी कराराचा भाग म्हणून हमासने २० जिवंत असलेल्या इस्रायली बंधकांना सोडले . या करारानुसार, इस्रायलने १,९०० हून अधिक पॅलेस्टिनी कैद्यांना सोडले आणि दुष्काळग्रस्त गाझाला अन्न आणि मदत पुरवठा वाढविण्याचेही मान्य केले.
शुक्रवारी सकाळी लागू झालेली ही युद्धबंदी ट्रम्प यांच्या २० कलमी गाझा शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यानुसार करण्यात आले आहे . युद्धबंदी करारांतर्गत , हमास आणि इस्रायलने सर्व ओलिसांना सोडले आहे . ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यांनी युद्ध सुरू झाले . तेव्हापासून इस्रायलने प्रत्युत्तरादाखल केलेल्या लष्करी कारवाईत ६७,००० हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत . युद्धबंदीमध्ये भूमिका बजावल्याबद्दल ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू आणि कतार यांच्या भूमिकेचे कौतुक केले.
