6G Network News: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली ६ व्हिजन डॉक्युमेंटची घोषणा, म्हणाले, “भारत आज …”

देशामध्ये ६जी टेस्ट बेड सुरु करण्याच्या निर्णयाचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले.

indian launch 6g network in 2030
Prime Minister Narendra Modi – संग्रहित छायाचित्र / फायनान्शिअल एक्सप्रेस

Bharat 6G Vision Documents: सध्या देशात रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया या सर्वात आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये ५जी सेवा सुरु झाली आहे. आता देश ६जी नेटवर्कच्या दिशेने प्रगती करत आहे. देशात ५जी यशस्वी लॉन्चिंगनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी इंडिया ६ व्हिजन डॉक्युमेंटची घोषणा केली आहे. तसेच ६जी रिसर्च अँड डेव्हलपमेंट (R&D) टेस्ट बेड लॉन्च केला आहे. विज्ञान भवन येथे एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन आंतरराष्ट्रीय टेलिकम्युनिकेशन युनियन (ITU) प्रादेशिक कार्यालय आणि इनोव्हेशन सेंटरचे उदघाटन केले.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

ITU उद्घटनाच्या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, ६जी R&D टेस्ट बेडमुळे देशात नवीन टेक्नॉलॉजीचा वेगाने अवलंब करण्यासाठी मदत होणार आहे. भारत ६जी व्हिजन डॉक्युमेंट आणि ६जी टेस्ट बेड देशामध्ये नवकल्पना, क्षमता निर्माण आणि वेगाने टेक्नॉलॉजी अवलंब करण्यासाठी एक योग्य वातावरण तयार करेल. ४जी सेवेच्या आधी भारत केवळ दूरसंचार टेक्नॉलॉजीचा वापरकर्ता होता. परंतु ”भारत आज जगातील दूरसंचार टेक्नॉलॉजीचा सर्वात मोठा निर्यातदार बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.”

हेही वाचा : Foxcon ‘या’ राज्यात करणार तब्बल ८ हजार कोटींची गुंतवणूक, ५० हजार रोजगार निर्मिती होणार

तसेच पंतप्रधान म्हणाले, भारत ५जी च्या मदतीने संपूर्ण जगाची कार्यसंस्कृती बदलण्यासाठी भारत अनेक देशांसोबत काम करत आहे. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, ” या १०० नवीन लॅब्स भारताच्या गरजांनुसार 5G अ‍ॅप्लिकेशन्स विकसित करण्यात मदत करतील. मग ते 5G स्मार्ट क्लासरूम्स असो, शेती असो, इंटेलिजेंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम किंवा आरोग्य सेवा असो, भारत प्रत्येक दिशेला वेगाने काम करत आहे.”

भविष्यातील टेक्नॉलॉजी प्रमाणात करण्यासाठी भारत ITU सह एकत्रितपणे काम करेल. तसेच नवीन भारत ITU क्षेत्रीय कार्यालय 6G साठी योग्य वातावरण तयार करण्यास मदत करेल.त्याच वेळी देशामध्ये ६जी टेस्ट बेड सुरु करण्याच्या निर्णयाचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले. भारत २०३० पर्यंत हाय-स्पीड 6G कम्युनिकेशन सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे.

हेही वाचा : ऑनलाईन जॉबद्वारे पैसे मिळवणे पडलं महागात, ९ लाखांना बसला गंडा; दिल्लीतील धक्कादायक घटना

टेलिकॉम सेक्टर स्किल कौन्सिल (TSSC) चे सीईओ अरविंद बाली म्हणाले, ६जी मध्ये २०३० पर्यंत अंदाजे १०० दशलक्ष सक्रिय ६जी उपकरणांसह अधिक वेग प्रदान करण्याची क्षमता आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान म्हणाले होते की २०३० पर्यंत सरकार ६जी सेवा लॉन्च करण्याची तयारी करत आहे.

इंडिया 6G व्हिजन डॉक्युमेंट 6G (TIG-6G) टेक्नॉलॉजी इनोव्हेशन ग्रुपने तयार केला होता, जो रोडमॅप विकसित करण्यासाठी नोव्हेंबर २०२१ मध्ये विविध मंत्रालये/विभाग, संशोधन आणि विकास संस्था, शैक्षणिक संस्था, मानकीकरण संस्था, दूरसंचार सेवा प्रदाते आणि उद्योग यांच्या सदस्यांसह तयार करण्यात आला होता. 6G टेस्ट बेडमुळे शैक्षणिक संस्था, उद्योग, स्टार्ट-अप, MSME, इत्यादींना उदयोन्मुख ICT तंत्रज्ञानाची चाचणी आणि पडताळणी करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. ITU ही माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान (ICT) साठी संयुक्त राष्ट्रांची विशेष एजन्सी आहे. या संस्थेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. भारताने क्षेत्रीय कार्यालय स्थापन करण्यासाठी मार्च २०२२ मध्ये ITU सोबत भागीदारी केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 10:27 IST
Next Story
अजून एक गौप्यस्फोट होणार! Hindenburg नं केली घोषणा; लवकरच नवा अहवाल होणार जाहीर
Exit mobile version