लग्नाला अवघा एक तास उरलेला असताना साडीवरुन आणि पैशांवरुन झालेला वाद शिगेला गेला आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याने तिला ठार केलं आहे. लग्नाला अवघा एक तास उरलेला असताना ही घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना गुजरातच्या भावनगर येथील आहे. टेकडी चौकाजवळ असलेल्या प्रभूदास तलावाजवळ ही धक्कादायक घटना घडली. साडी आणि पैसे यावरुन वाद झाला आणि तो इतका शिगेला गेला की होणाऱ्या पतीने त्याच्याच होणाऱ्या पत्नीला संपवल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणात आता पोलिसांनी साजन बराईयाला अटक केली आहे.

साजन बराईया होणाऱ्या पत्नीची हत्या करुन फरार झाला होता

साजन बराईया आणि सोनी हिमंत राठोड या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. हे दोघंही मागच्या एक ते दीड वर्षांपासून एकत्र राहात होते. त्यांनी साखरपुड्याचे विधी पूर्ण केले होते. त्यानंतर लग्नाला अवघा एक तास राहिलेला असताना सोनी आणि साजन यांच्यात साडीवरुन आणि पैशांवरुन वाद झाला. साजनने लोखंडी पाईपने सोनीवर वार केले. त्यानंतर भिंतीवर तिचं डोकं आपटलं आणि तिच्यावर वार करुन तिला ठार केलं. एवढंच नाही तर या दोघांचा ज्या ठिकाणी वाद झाला त्या घराची नासधूस साजनने केली. पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पण तोपर्यंत साजन फरार झाला होता. आता पोलिसांनी साजनला अटक केली आहे.

भावनगर पोलिसांनी काय सांगितलं?

भावनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साजन बराईयावर सहा गुन्हे दाखल आहेत. सोनीची हत्या करणं हा सातवा गुन्हा आहे. साजन बराईया हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर आधी हत्या, हत्येचा प्रयत्न, दुखापत करणं, हिंसाचार, मारहाण असे गुन्हे दाखल आहेत. सोनी आणि साजन यांचं प्रेम होतं. पण त्यांच्या घरातून त्यांच्या नात्याला विरोध होता. त्यामुळे हे दोघं वेगळे राहात होते. शनिवारी म्हणजेच १५ नोव्हेंबरला या दोघांनी साखरपुडा केला. लग्नाला एक तास उरलेला असताना साडी आणि पैशांवरुन दोघांमध्ये विकोपाला जाणारा वाद झाला आणि त्यानंतर साजनने सोनीला लोखंडी रॉडने मारलं. तिचं डोकंही भिंतीवर आपटलं. ज्यात सोनीचा जागीच मृत्यू झाला. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

फरार साजनला पोलिसांनी केली अटक

DySP आर. आर. सिंघल यांनी सांगितलं की जेव्हा “सोनी आणि साजन यांचा लग्नाचा निर्णय झाला तेव्हा ती तिच्या घरी परतली होती. साजन तिच्याकडे आला तिच्या लग्नाची साडी आणि पैसे यावरुन सोनी आणि साजन यांच्यात वाद झाला. त्यानंतर राग अनावर झालेल्या साजनने सोनीच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केले. तसंच तिचं डोकंही भिंतीवर आपटलं. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर साजन फरार झाला होता आम्ही त्याला अटक केली आहे.”