Pune Engineer died in America : मूळचा पुण्याचा असलेला सिद्धांत पाटील याचा अमेरिकेत मृत्यू झाला आहे. अमेरिकेतली मोंटाना येथईल ग्लेशिअर येथील नॅशनल पार्कमध्ये बुडून त्याचा मृत्यू झाला होता. चार आठवड्यानंतर त्याचा मृतदेह बचावपथकाला सापडला. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. पाटील यांच्या पुण्यातील कुटुंबीयांनी सोमवारी सांगितलं की अमेरिकन अधिकाऱ्यांनी त्यांना त्यांच्या मुलाचा मृतदेह सापडल्याची माहिती दिली आहे. पाटील हे सात मित्रांसह रॉकी माऊंटनमधील उद्यानात फिरत होते6 जुलै रोजी जेव्हा तो हिमस्खलन खाडीत पडला. सिद्धांत पाटील हा मुळचा महाराष्ट्रातील असून तो सध्या अमेरिकेतील सन जॉस येथे वास्तव्यास होता. तिथे तो एका कंपनीत अभियंता म्हणून नोकरी करत होता. ६ जुलै रोजी तो आपल्या काही मित्रांसह सुट्टी साजरी करण्यासाठी ग्लेशियर नॅशनल पार्कमध्ये गेला होता. तो आणि त्याचे काही मित्र अॅव्हेलाच तळ्याजवळ गेले असताना सिद्धांत अचानक तळ्यात कोसळला. (Pune Engineer died in America) रविवारी एका निवेदनात, ग्लेशियर नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “चार आठवड्यांच्या शोधानंतर, ग्लेशियर नॅशनल पार्कमधील रेंजर्सने सिद्धांत विठ्ठल पाटीलचा मृतदेह बाहेर काढला आहे. मित्रांच्या म्हणण्यानुसार पाटीलने घटनेच्या वेळी परिधान केलेले कपडे आणि गियर देखील जप्त करण्यात आले आहेत. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास, एका व्यक्तीने घाटाच्या खाली एक मृतदेह पाहिल्याची माहिती दिली. रेंजर्सनी तातडीने तेथे जाऊन तपासणी केली असता तो मृतदेह सिद्धांत पाटीलचा असल्याचे स्पष्ट झाले. हेही वाचा >> हिच-हायकिंगसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील तरुणाचा अमेरिकेच्या ग्लेशियर नॅशनल पार्कमधील तळ्यात बडून मृत्यू सिद्धांत पाटील जिवंत असेल अशी त्याच्या कुटुंबियांची आशा होती. परंतु, ही आशा आता धुळीस मिळाली आहे. १४ जुलै रोजी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना त्याचे काका प्रितेश चौधरी म्हणाले, “आम्हाला आशा आहे की सिद्धांत जिवंत सापडेल. चमत्कार घडतात, आणि आम्ही अशाच एका चमत्काराची वाट पाहत आहोत. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार पाटील यांनी उद्यानात फिरताना आईला फोन केला. “त्याने त्याच्या आईला सांगितले की तो इतर सहा भारतीय मित्रांसह तीन दिवस उद्यानात होता आणि ते सर्व त्यांच्या सहलीचा आनंद घेत होते”, चौधरी म्हणाले. अपघाताच्या दोन तास आधी, त्याने त्याच्या आईला मेसेज देखील केला होता की तो तीन दिवसांत सॅन जोसला परतणार आहे. सिद्धांत एकुलता एक मुलगा होता. २०२० पासून तो अमेरिकेत राहत होता. तो कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस एंजेलिस (UCLA) मधून एमएस करण्यासाठी तेथे गेला होता.पाटीलचे वडील गेल्या वर्षी महाराष्ट्र सरकारच्या पाटबंधारे विभागातून निवृत्त झाले असून त्यांची आई गृहिणी आहे.