Rajnath Singh big statement on pok residents : भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरूवारी (२९ मे) पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील नागरिकांबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे. तेथील लोक हे भारतीय कुटुंबाचा भाग आहेत असे सिंह म्हणाले आहेत. तसेच त्यांनी एकादिवशी भारताच्या मुख्य प्रवाहात परत येतील.

राजनाथ सिंह म्हणाले की, “माझे मत आहे की पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील लोक हे आपले आहेत, आपल्या कुटुंबाचा भाग आहेत.” तसेच सिंह म्हणाले की “मला पूर्ण विश्वास आहे की आपले जे बांधव भौगोलिक आणि राजकीय दृष्ट्‍या आपल्यापासून वेगळे झाले आहेत, ते देखील त्यांच्या आत्म्याच्या आवाज ऐकून कोणत्याही क्षणी भारताच्या मुख्य धारेत परत येतील.”

नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्याला उत्तर देतेवेळी भारत आणखी बरंच काही करू शकत होता. मात्र ऑपरेशन सिंदूर दरम्यान संयम बाळगण्यात आला. पाकिस्तानवर टीका करताना राजनाथ सिंह म्हणाले की भारताने दहशतवादाबद्दल आपली रणनीती आणि प्रतिसाद हा नव्याने तयार केला असून याची नवी व्याख्या करण्यात आली आहे.

सिंह म्हणाले की, पाकिस्तानबरोबर संभावित चर्चा ही फक्त दहशतवादी आणि पीओकेच्या मुद्द्यावरच होईल. भारतीय उद्योघ परिसंघ (सीआयआय) च्या बिझनेस समिटमध्ये बोलताना संरक्षणमंत्री सिंह यांनी पीओकेमधील नागरिकांना साद घालण्याचा प्रयत्न केला. भारत त्यांना आपल्या कुटुंबाचा भाग मानतो असे सिंह यावेळी म्हणाले.

सिंह म्हणाले की पीओकेमधील बहुतांश लोकांना भारताबाबत आत्मियता वाटते आणि काही मोजगे लोकच भटकले आहेत. ते म्हणाले की, “भारत नेहमीच हृदयांना जोडण्याबाबत बोलत आला आङे आणि आमचे मत आहे की, प्रेम, एकता आणि सत्य यांच्या मार्गावर चालत राहून तो दिवस दूर नाही जेव्हा आपला हक्काचा भाग पीओके परत येईल आणि म्हणेल मी भारत आहे, मी परत आलो आहे.”

पीओकेमधील लोक कुटुंबाचा भाग

संरक्षणमंत्री मंत्री म्हणाले की, “माझा मत आहे की पाक व्याप्त काश्मीरचे लोक आपले आहे. आपल्या कुटुंबाचा भाग आहेत. आम्ही ‘एक भारत श्रेष्ठ भारत’च्या संकल्पासाठी वचनबद्ध आहोत. आज भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्या आपल्यापासून वेगळे झालेले आपले बांधवही आपल्या स्वाभिमानाने, आत्म्याच्या आवाजाने आणि स्वेच्छेने एक दिवस भारताच्या मुख्य प्रवाहात परततील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. तिथल्या बहुतेक लोकांना भारताशी खोल नाते वाटते, दिशाभूल झालेले काही मोजकेच लोक आहेत.”

राजनाथ सिंह पुढे बोलताना म्हणाले, “पीओकेमध्ये राहणाऱ्या आपल्या भावंडांची स्थिती वीर योद्धा महाराणा प्रताप यांचे धाकटे भाऊ शक्ती सिंह यांच्यासारखीच आहे. त्यांचे धाकटे भाऊ शक्ती सिंह हे वेगळे झाल्यानंतरही, मोठे भाऊ महाराणा प्रताप यांचा त्यांच्यावर विश्वास अबाधित राहिला होता आणि ते मोठ्या आत्मविश्वासाने म्हणत – ‘तब कुपंथ को छोड़ सुपथ पर स्वयं चला आएगा। मेरा ही भाई है, मुझसे दूर कहां जाएगा।'”

पाकिस्तानला स्पष्ट भाषेत इशारा देत सिंह म्हणाले की दहशतवाचा व्यापार करून फायदा मिळणार नाही. उलट त्याची मोठी किंमत मोजावी लागेल आणि पाकिस्तानला आता याची जाणीव झाली आहे.