पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी मुलगा पंकज सिंग याने लाच घेतल्याने त्याला पंतप्रधानांनी फटकारले तसेच पंकज सिंग याच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केल्याबद्दल आपल्यालाही फटकारण्यात आले, या वृत्ताचा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी इन्कार केला आहे. आपण व आपल्या कुटुंबीयांवरील कुठलाही आरोप सिद्ध झाला, तर सार्वजनिक जीवन व राजकारण दोन्ही सोडून देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान प्रसारमाध्यमात अलीकडे येत असलेली माहिती ही खोटी असून त्यात काही तथ्य नाही, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. वृत्त- लोकसत्ता
संग्रहित लेख, दिनांक 28th Aug 2014 रोजी प्रकाशित
राजनाथ सिंह यांची पाठराखण
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या मुलाविरोधात काही माध्यमांमध्ये छापून आलेल्या वृत्तानंतर पंतप्रधान कार्यालयाने तातडीने ट्विटरच्या माध्यमातून सर्व आरोप फेटाळून लावले.
First published on: 28-08-2014 at 03:22 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajnath was unhappy over rumours being spread about his son being pulled up by pm modi