Rakshabandhan Leave : स्वातंत्र्यदिनापासून देशभरात लाँग विकेंड सुरू झाला आहे. १५ ला स्वातंत्र्यदिन, १७ ला शनिवार, १८ ला रविवार आणि १९ ला रक्षाबंधन आल्याने अनेकांनी लाँग विकेंडसाठी फिरण्याचे प्लान्स केलेत. परंतु, ज्यांना या सुट्ट्या लागू होत नाहीत, त्यांनीही सुट्ट्यांसाठी कार्यालयांमध्ये अर्ज केले आहेत. खासकरून अनेकांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने सुट्ट्या काढल्या आहेत. परंतु, पंजाबमधील एका कार्यालयात रक्षाबंधनाची सुट्टी काढल्याने एका तरुणीला कामावरून काढून टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या संबंधित मुलीने लिंक्डइनवरून याची माहिती दिली. तर, तिच्या या पोस्टवर कंपनीनेही खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोहाली येथील डिजिटल मार्केटिंग फर्म असलेल्या B9 सोल्यूशन्समध्ये बाबीना ही तरुणी एचआर विभागात काम करते. तिने लिंक्डिइनवर केलेल्या पोस्टनुसार, तिने रक्षाबंधनाची सुट्टी मागितली असता तिला कामावरून काढून टाकण्यात आलं. तिने यासंदर्भातील बॉसबरोबर व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीन शॉटही शेअर केले आहत. बॉसबरोबरच्या चॅटनुसार, १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असून या दिवशी हजर राहणं अनिवार्य आहे. यादिवशी अर्धा दिवस किंवा लहान सुट्टीही दिली जाणार नाही.तरीही कोणी सुट्टी घेण्याचा प्रयत्न केला तर एका दिवसाच्या सुट्टीसाठी सात दिवसांचा पगार कापला जाईल, असा इशारा यातून देण्यात आला.

हेही वाचा >> आप्पाचा विषय का हार्ड आहे? तरुणांनी सांगितले मजेशीर कारण, Video होतोय व्हायरल

याबाबत बबीना म्हणाली, “पण हे अनैतिक आहे. कायदा आणि मुलभूत अधिकारांचं हे उल्लंघन आहे. तुही एका दिवसासाठी सात दिवसांचा पगार कापू शकत नाही.”, यावर तिच्या बॉसने प्रतिक्रिया दिली की, “हो मला माहीत आहे. पण मला करावे लागेल. अन्यथा तुम्ही राजीनामा देऊ शकता. मला काही अडचण नाही.”

“कायद्यांनुसार जे चुकीचे होते त्याविरोधात बोलण्याचा प्रयत्न केला तर टर्मिनेशन लेटर मिळालं. त्याने ईमेलमध्ये नमूद केले आहे की ते मला २ आठवड्यांचा वेळ देतील. पण मी ताबडतोब निघून जावे म्हणून त्यांनी माझ्याकडील सर्व अधिकार काढून घेतले”, असं स्पष्टीकरण त्याने दिलं.

कंपनीनेही दिलं स्पष्टीकरण

B9 सोल्युशन्सने यादरम्यान प्रतिक्रिया दिली की, “बाबीनाची पोस्ट ही कथेची फक्त एक बाजू आहे: बळीचे कार्ड खेळणे आणि सहानुभूती मिळवणे खूप सोपे आहे.कथेची फक्त एक बाजू ऐकून न्याय करणे खूप सोपे आहे.”

कंपनीने असेही म्हटले आहे की बाबीनाला तिच्या कामाच्या ठिकाणी अनेकवेळा वॉर्निंग देण्यात आली होती. बबीनाने तुमच्यापैकी कोणाला सांगितले होते का की तिला तिच्या कामाच्या वेळेत ऑनलाइन कोर्स करताना, जास्तवेळ फोन वापरल्याबद्दल अनेकदा इशारे मिळाले आहेत. कंपनीचे सोशल मीडिया खाते सांभाळता येत नाही, रिक्त पदे भरता येत नाहीत, कामाच्या वेळेत ती तिच्या मुलीचा गृहपाठ करते. तिने सर्व कर्मचाऱ्यांना १५ ऑगस्टपासून २० तारखेपर्यंत भरपगारी लांब रजा मिळवण्यासाठी षडयंत्र आणि यूनियन तयार करण्याचा प्रयत्न केला.

कंपनीने बबीना यांच्यावर व्यवस्थापनाचा “फेरफार” करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला: “सर्व कार्यालयाने १५ ऑगस्टच्या सुरुवातीच्या सुट्टीच्या निर्णयाला पाठिंबा दिला होता. वीकेंडला सुट्टी दिली होती आणि प्रत्येकजण १९ ऑगस्टला लवचिक शिफ्टसह अर्धा दिवस काम करण्याची हमी दिली होती. ही कर्मचाऱ्यांची मागणी आहे, असे सांगून बबीना व्यवस्थापनाशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न करत होती. हा मेसेज तिला आत्ताच का पाठवला आहे असे तुम्हाला वाटते? इतर कोणी विरोध का केला नाही?” असा सवालही कंपनीने विचारला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakshabandhan leave a women fired for asking for leave company also react sgk
Show comments