रशियाने युक्रेनची राजधानी किव्ह, ईशान्येकडील खार्किव्ह आणि दक्षिणेकडील खेरसन या तीन शहरांवर हल्ला करण्यासाठी आक्रमणरेषा निश्चित केल्या असून या तिन्ही शहरांच्या संरक्षणाचा निर्धार युक्रेनने व्यक्त केला. दरम्यान, रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत काही सैनिक आणि तीन मुलांसह १९८ जणांचा मृत्यू झाल्याचे युक्रेनच्या आरोग्यमंत्र्यांनी शनिवारी सांगितले. 

“तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. एक तर तिसरं जागतिक महायुद्ध सुरू करा आणि थेट रशियन सैन्याशी आमने-सामने लढा. किंवा दुसरा म्हणजे जो देश (रशिया) आंतरराष्ट्रीय नियमच पाळत नाही, त्यांच्या विरोधात वागतोय, त्या देशाला त्यासाठी किंमत चुकवायला लावा”, असं बायडेन म्हणाले आहेत.

Live Updates

Russia Ukraine War : रविवारी रशियाने बेलारुसमध्ये दिलेली चर्चेची ऑफर युक्रेनच्या अध्यक्षांनी नाकारली आहे.

12:18 (IST) 27 Feb 2022

रशियाने युक्रेनच्या दक्षिण आणि आग्नेय भागात दोन मोठ्या शहरांना वेढा घातल्याचा दावा केला आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

12:17 (IST) 27 Feb 2022
रोमानियाहून चौथं विमान मायदेशी परतलं

ऑपरेशन गंगा सुरू असून रोमानियाहून चौथं विमान १९८ भारतीयांना घेऊन दिल्लीसाठी परत निघालं आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली.

https://platform.twitter.com/widgets.js

12:12 (IST) 27 Feb 2022
२४० भारतीयांना घेऊन तिसरे विमान बुडापेस्टहून दिल्लीला पोहोचले

युक्रेनमध्ये अडकलेल्या २४० भारतीय नागरिकांना घेऊन बुडापेस्टहून आलेले तिसरे विमान रविवारी पहाटे दिल्ली विमानतळावर उतरले आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्वीटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. तर, मृत्यूच्या विळख्यातून सुखरूपणे मायदेशी परतल्याचा आनंद युक्रेनमधून आलेल्या भारतीय नागरिकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. Ukraine-Russia War : २४० भारतीयांना घेऊन तिसरे विमान बुडापेस्टहून दिल्लीला पोहोचले ; सुखरूप मायदेशी परतल्याचा नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद


https://platform.twitter.com/widgets.js

11:46 (IST) 27 Feb 2022
ICRC ने रशियन सैनिकांचे मृतदेह त्यांच्या देशात पाठवण्यास सांगितले

इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉस या जिनिव्हास्थित मानवाधिकार संघटनेने सांगितले की, युक्रेनमधील युक्रेनचे राजदूत आणि इतरांनी युक्रेनमध्ये मारल्या गेलेल्या रशियन सैनिकांचे मृतदेह त्यांच्या देशांना परत करण्याच्या विनंतीबद्दल कल्पना आहे. परंतु आतापर्यंत किती सैनिक मारले गेले याची आकडेवारी आमच्याकडे नाही. आतापर्यंत साडेतीन हजार रशियन सैनिक मारले गेल्याचा दावा करण्यात येत आहे.

राजदूत सर्गेई किसलित्स्या यांनी शनिवारी ट्विट केले, “सैनिकांच्या पालकांना सन्मानाने मुलांचा अंत्यसंस्कार करण्याची संधी दिली पाहिजे. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना ही शोकांतिका लपवू नये,” असे त्यांनी आवाहन केले.

11:27 (IST) 27 Feb 2022
वैद्यकीय शिक्षणासाठी मुलं बाहेर देशात जात असल्याने पैसा देशाबाहेर जातोय – पंतप्रधान मोदी

वैद्यकीय शिक्षणासाठी भारतीय मुलं जगभरात जातात. तिथं भाषेची अडचण आहे. तरीही ते जातात. त्यामुळे देशातील पैसा देखील भारताबाहेर जातो. मुलं शिक्षणासाठी बाहेर जाऊ नये, यासाठी प्रायव्हेट सेक्टरने पुढाकार घ्यावा आणि राज्य सरकारने योजना राबवाव्या, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं. युक्रेनमध्ये भारतातील मोठ्या प्रमाणातील विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जातात. सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर मोदींनी हे वक्तव्य केलं आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

11:22 (IST) 27 Feb 2022
युक्रेनमधून २५० भारतीयांना घेऊन दुसरे विमान परतले

एअर इंडियाचे दुसरे विमान युक्रेनमधून २५० भारतीयांना घेऊन दिल्लीत आले

युक्रेनमध्ये अडकलेल्या २५० भारतीय नागरिकांना घेऊन एअर इंडियाचे दुसरे विमान शनिवारी रात्री उशिरा रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून दिल्ली विमानतळावर पोहोचले. सरकारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

11:20 (IST) 27 Feb 2022
युक्रेनच्या ट्रेनमध्ये लंगर सेवा

युक्रेनमध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे पोलिश सीमेपर्यंत ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या वेगवेगळ्या देशांतील लोकांना हरदीप सिंग लंगरच्या माध्यमातून जेवण पुरवत आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

11:16 (IST) 27 Feb 2022
अमेरिका, सहयोगी देश काही रशियन बँकांना ‘स्विफ्ट’पासून वेगळे करणार

युक्रेनवरील रशियन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, अमेरिका आणि त्याचे मित्र आणि मित्र राष्ट्रांनी बंदी घातलेल्या रशियन बँकांना जागतिक वित्तीय प्रणाली 'स्विफ्ट' वित्तीय प्रणालीतून काढून टाकण्याचा आणि रशियाच्या मध्यवर्ती बँकेवर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका, युरोपियन युनियन, फ्रान्स, जर्मनी, इटली, ब्रिटन आणि कॅनडाच्या नेत्यांनी शनिवारी जारी केलेल्या संयुक्त निवेदनानुसार, बंदी घातलेल्या रशियन कंपन्या आणि कुलीन वर्गाच्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी आणि त्यावर कारवाई करण्यासाठी एक संयुक्त टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.

11:14 (IST) 27 Feb 2022
किव्हमध्ये सोमवापर्यंत कर्फ्यू

युद्धामुळे हजारो युक्रेनियन लोकांनी आपली घरे सोडली आहेत. UN अधिकार्‍यांनी सांगितले की युक्रेनमधून १ लाख २० हजारांहून अधिक लोक पोलंड, मोल्दोव्हा आणि इतर शेजारील देशांमध्ये निघून गेले आहेत. दरम्यान, सोमवारी सकाळपर्यंत शहरातील कर्फ्यू सुरू राहणार असल्याचे किव्हमधील अधिकाऱ्यांनी सांगितले. रशियन सैन्य राजधानीच्या दिशेने कूच करत आहे.

11:10 (IST) 27 Feb 2022
जपानी अब्जाधीशांची युक्रेनला मदत

जपानी अब्जाधीश हिरोशी ‘मिकी’ मिकितानी यांनी रशियाच्या आक्रमणाला लोकशाहीसमोरील आव्हान म्हणत युक्रेन सरकारला ८.७ दशलक्ष डॉलर्सची मदत देणार असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात ई-कॉमर्स कंपनीचे संस्थापक राकुटेन यांनी व्होलोडिमिर झेलेन्स्की यांना पत्र लिहिलं आहे.

10:42 (IST) 27 Feb 2022

“आम्ही सुमारे २०० रशियन सैनिकांना पकडले आहे, त्यापैकी काही फक्त १९ वर्षांचे आहेत.
ते अजिबात प्रशिक्षित नाही. आम्ही त्यांच्या पालकांना याबद्दल फोन करून सांगितलं असता त्यांना धक्का बसला आहे.” असा दावा युक्रेनिनन मेजर जनरल बोरिस क्रेमेनेत्स्की यांनी केला आहे.

10:37 (IST) 27 Feb 2022

रशियन सैन्याने सर्व बाजूंनी युक्रेनची राजधानी किव्हकडे येण्यास सुरुवात केली आहे. रविवारी पहाटे वासिल्किवमध्ये राजधानीच्या दक्षिणेला दोन मोठे स्फोट ऐकू आले, अशी बातमी रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिली.

रशियन सैन्याने युक्रेनच्या खार्किव शहरामध्ये प्रवेश केला आहे आणि लढाई सुरू आहे, असे प्रादेशिक प्रशासनाच्या प्रमुखांनी सांगितले.