Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून संघर्ष सुरु आहे. या संघर्षात रशिया सातत्याने युक्रेनवर हल्ले करत आहे. या युद्धात युक्रेनची अनेक शहरे उद्ध्वस्त होत आहेत. एवढंच नाही तर या युद्धाचे परिणाम जगभरात देखील पाहायला मिळतात. मात्र, आता युक्रेन-रशियातील संघर्ष तात्पुरता थांबण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मध्यस्थी करत असून त्यांची मध्यस्थी सफल होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युक्रेनने देखली युद्धबंदीबाबत तयारी दर्शवली आहे. तसेच या संदर्भात सौदी अरेबियामध्ये अमेरिका आणि युक्रेनियन अधिकाऱ्यांमध्ये काही दिवसांपूर्वी उच्चस्तरीय चर्चाही झाली. आता व्हाईट हाऊस आणि कीव यांच्या संयुक्त निवेदनानुसार, युद्धबंदी प्रस्तावात तात्पुरती युद्धबंदीची तरतूद आहे. जी दोन्ही बाजूंनी मान्य केल्यास वाढवता येऊ शकते. दरम्यान, युक्रेनने याबाबत आपली वचनबद्धता दर्शविलेली आहे. त्यामुळे आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भूमिका काय असणार? याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे.

यातच आज (१८ मार्च) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमिर पुतिन यांनी फोनवरून संवाद साधत युक्रेन-रशियातील युद्धविरामाबाबतीत चर्चा केली असल्याची माहिती व्हाईट हाऊसकडून देण्यात आली आहे. याबाबत व्हाईट हाऊसचे डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ यांनी माहिती दिली असून डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमिर पुतिन यांच्यात संवाद सुरु आहे. तसेच हा संवाद सकारात्मक होत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका व युक्रेन दरम्यान युद्धविरामाचा करार झाला असून त्यानुसार ३० दिवस युद्ध थांबवण्यालाठी प्रयत्न सुरु आहेत. तसेच त्यानंतर या कराराचा कायमस्वरूपी विस्तार करण्यासाठी प्रयत्न केले जातील. अमेरिकने या कराराचा प्रस्ताव रशियासमोर मांडलेला आहे. मात्र, या करारावर व्लादिमिर पुतिन यांनी त्यातील काही अटींवर प्रश्न उपस्थित केले होते. पण ट्रम्प यांनी हे युद्ध थांबवण्यासाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे आता व्लादिमिर पुतिन यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलेलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russia ukraine war will the stop donald trump and vladimir putin talk over the phone big announcement to be made soon main disc news gkt