Sambhal violence UP Man Video call to Pakistani maulvi goes viral : शाही जामा मशीदीच्या मुद्द्यावर पाकिस्तानातील मौलानाशी कथितरित्या बोलल्याच्या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या संभल येथील एका २४ वर्षीय व्यक्तीला गुरूवारी अटक करण्यात आली आहे. भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता धोक्यात आणल्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोहम्मद अकिल असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो मिर्झापूर नारूल्लापूर गावचा रहिवासी आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम १५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकार्‍याने दिलेल्या तक्रारीनंतर संभलच्या बहजोई पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला स्थानिक न्यायालयासमोर हजर केल्यानंतर शुक्रवारी कोर्टाने त्याची रवानगी तुरूंगात केली आहे.

नेमकं काय झालं?

संभलचे एएसपी श्रीश चंद्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकिलने पाकिस्तानातील मौलवी मोहम्मद अली मिर्झा याच्याशी १५ जानेवारी रोजी चर्चा केली. त्याने न्यायालयाने शाही जामा मशि‍दीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिल्यानंतर गेल्या वर्षी २४ नोव्हेंबर रोजी संभलमध्ये उसळलेल्या हिंसाचारात मृत्यू झालेल्यांना शहीद म्हटले जावे की नाही याबद्दल पाकिस्तानातील मौलवीकडे विचारणा केली.

दोघांमध्ये बोलणं काय झालं?

“त्या दिवशीचा हिंसाचार रोखण्यात पोलिसांच्या सहभागावर देखील त्याने प्रश्न उपस्थित केले. व्हिडीओ कॉल आणि मोबाइल वर केलेल्या चॅटचा तपशील आमच्या ताब्यात आहे. यामुळे लोकांच्या भावनांना धक्का पोहचला आहे आणि देशाची बदनाम झाली आहे,” असेही एएसपी चंद्रा म्हणाले.

संभल येथे झालेल्या हिंसाचारात पाच लोकांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते ज्यामध्ये पोलीस कर्मचार्‍यांचा देखील समावेश होता. न्यायालयाने मंदिर तोडून मशीद उभारण्यात आली आहे की नाही याचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते, यासाठी स्थानिक न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

एसपी चंद्रा यांनी सांगितलं की तो पाकिस्तानातील इतर कोणाच्या संपर्कात होता का हे तपासण्यासाठी अकिलच्या मोबाइल फोनचा तपास केला जात आहे. “नोव्हेंबरमध्ये शहरात झालेल्या हिंसाचारात त्याचा सहभाग होता का हे तपासण्यासाठी चौकशी केली जात आहे,” असेही चंद्रा म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhal violence up man arrested for endangering unity of india after video call to pakistani maulvi goes viral marathi news rak