पणजीतील लढाई ही प्रामाणिक कार्यकर्त्याविरुद्ध एक माफिया अशी आहे. ज्या व्यक्तीवर अपहरण, खंडणी, बलात्कार असे अनेक गुन्हे आहेत, त्यांना विरोध करण्यासाठी उत्पल पर्रिकर उभे आहेत. गोव्याच्या राजकारणाचा चेहरा अत्यंत बेसूर झालाय, तो बदलायचा असेल तर अनेक मतदारसंघामध्ये जे प्रामाणिक उमेदवार उभे आहेत, त्यांना निवडून दिलं पाहिजे. याची सुरुवात पणजी मतदारसंघातून व्हायला पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“गोव्याच्या जनतेनं प्रत्येक मतदारसंघात पणजीचा आदर्श ठेवला पाहिजे. शिवसेनेनं उत्पल पर्रिकरांच्या समर्थनासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमचा उमेदवार मागे घेतला आहे. फक्त उमेदवार मागे घेतलेला नाही, तर आमचे कार्यकर्ते त्यांचा प्रचारही करतील,” असं संजय राऊतांनी सांगितलं. यावरून भाजपाने आत्मचिंतन करावं, त्यांना इशारा देण्याची गरज नाही. “पंतप्रधान मोदींना देशातील राजकारणाचा चेहरा स्वच्छ करायचा आहे. परंतु काल अमित शाह गोव्यात प्रचारासाठी आले आणि ज्या उमेदवारासाठी मागितली त्याच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत,” असं म्हणत राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली.

शिवसेनेकडून उत्पल पर्रिकरांना थेट पाठिंबा; पणजीतून उमेदवारी घेतली मागे, राऊत म्हणाले “आमचे कार्यकर्ते…”

दरम्यान, पणजीतून उत्पर पर्रिकर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उभे राहिल्यास त्यांच्या विरोधात शिवसेना उमेदवार देणार नाही, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यांनी म्हटल्याप्रमाणेच शिवसेनेचे पणजी मतदारसंघातील उमेदवार शैलेंद्र वेलिंगकर यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. शिवसेनेनं दिलेला शब्द पाळला असल्याचं म्हणत संजय राऊत यांनी याबद्दल माहिती दिली.

“आम्ही आमचा शब्द पाळत आहोत. शिवसेनेचे शैलेंद्र वेलिंगकर यांनी पणजीमधून उमेदवारी मागे घेतली आहे. इतकेच नाही तर आमचे कार्यकर्ते उत्पल पर्रीकर यांना पूर्ण पाठिंबा देतील. पणजीची लढाई ही केवळ निवडणुकीपुरती आहे. पण हे गोव्याच्या राजकारणाचे शुद्धीकरणही आहे, असे आमचे मत आहे,” असं संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut commented on utpal parrikar amit shah pm modi and goa election hrc