कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आपल्या एका ट्विटमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांनी एका ट्विटमध्ये म्हटले की सियाचीन हा चीनचा भाग आहे आणि ट्विटरकरांनी त्यांच्यावर अक्षरशः धारेवर धरले.

झाले असे की त्यांना भेटण्यासाठी चीनवरुन एक शिष्टमंडळ आले. या शिष्टमंडळाचे प्रमुख ली झाँग हे सियाचीन प्रांतातील आहेत असे सिद्धरामय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले. ली झाँग यांच्यासोबत पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.

या पोस्टमध्ये खरं तर त्यांना सिचुआन असे म्हणायचे होते परंतु मुख्यमंत्र्याचे ट्विटर अकाउंट सांभाळणाऱ्या व्यक्तीने आपल्या ऑटोकरेक्टद्वारे ते लिहिले आणि अर्थाचा अनर्थ झाला.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये सिचुआन ऐवजी सियाचीन लिहिल्यानंतर अनेक जणांनी त्यांना याबाबतची माहिती दिली. सिचुआन हा चीनमधील एक प्रांत असून सियाचीन हा भाग विवादित जरी असला तरी त्यावर आपलाच हक्क असल्याचे नेटाजन्सनी म्हटले.

त्यांच्यावर होणाऱ्या ट्रोल्सनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपले ट्विट डिलीट केले आहे. त्यांनी हीच पोस्ट फेसबुकवर देखील टाकली होती. तिथे देखील सिद्धरामय्या यांना लोकांनी ट्रोल केले. तेथून देखील ही पोस्ट काढून टाकण्यात आली.