चित्त्यांच्या सरंक्षणासाठी 'स्निफर डॉग' करणार तैनात, आयटीबीपीकडून खास प्रशिक्षण सुरू | sniffer dog squad will deployed in Kuno National Park to protect Namibian cheetah rmm 97 | Loksatta

चित्त्यांच्या सरंक्षणासाठी ‘स्निफर डॉग’ करणार तैनात, आयटीबीपीकडून खास प्रशिक्षण सुरू

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आलेल्या नामिबियन चित्त्याचं रक्षण करण्यासाठी श्वान पथक तैनात करण्यात येणार आहे.

चित्त्यांच्या सरंक्षणासाठी ‘स्निफर डॉग’ करणार तैनात, आयटीबीपीकडून खास प्रशिक्षण सुरू
फोटो सौजन्य- एएनआय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी नामीबीया देशातून ८ चित्ते भारतात आणण्यात आली आहे. या चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आलं आहे. या चित्त्याचं संरक्षण करण्यासाठी आता श्वान पथक तैनात करण्यात येणार आहे. यासाठी इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) च्या राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रात ‘जर्मन शेफर्डस’ जातीच्या कुत्र्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे. हे केंद्र हरियाणातील पंचकुला येथे आहे.

या श्वान पथकाच्या माध्यमातून नुकतंच नामीबीया देशातून भारतात आणलेल्या चित्त्यांना संरक्षण पुरवलं जाणार आहे. हे श्वान पथक शिकाऱ्यांपासून चित्त्यांना असलेला धोका ओळखतील आणि नवीन वातावरणात आलेल्या चित्त्यांचं रक्षण करतील. त्याचबरोबर वाघाची कातडी, हाडे, हत्तीचे दात, रेड सँडर्स आणि इतर बेकायदेशीर वन्यजीव उत्पादने शोधण्याचे प्रशिक्षणही या कुत्र्यांना दिलं जाईल. या कुत्र्यांना वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर इंडिया आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्सद्वारे प्रशिक्षण दिले जात आहे.

स्निफर डॉगला प्रशिक्षण देतानाचा व्हिडीओ

हेही वाचा- ७० खून आणि २५० दरोडे; एकेकाळचे कुख्यात डाकू रमेश सिंग सिकरवार बनले ‘चित्ता मित्र’, आफ्रिकेतून आणलेल्या चित्यांचं करणार रक्षण

या श्वान पथकाला पुढील सात महिने प्रशिक्षण दिलं जाणार आहे. ‘स्निफर डॉग’ म्हणून आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसात केल्यानंतर या श्वान पथकाला मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये तैनात केलं जाणार आहे. हे स्निफर डॉग पुढील वर्षी एप्रिलपर्यंत चित्त्यांसह इतर प्राण्यांचं संरक्षण करण्यासाठी पूर्णपणे प्रशिक्षित होतील.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मुलासह आझम खान फरार; न्यायालयात अनुपस्थित राहिल्यावर पोलिसांची माहिती, पिता-पुत्रांनी राज्य सरकारची सुरक्षाही नाकारली

संबंधित बातम्या

“फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते पण…”, आफताबच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडने सांगितले धक्कादायक अनुभव
पत्रकार रवीश कुमार यांचा राजीनामा; २६ वर्षांनंतर NDTV ची साथ सोडली
“महाराष्ट्र असा-तसा वाटला का?”, फडणवीसांना आव्हान देणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना अजित पवारांचा इशारा, म्हणाले “आता फक्त मुंबई…”
Bilkis Bano Case: बिल्किस बानोंची सर्वोच्च न्यायालयात धाव, सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींच्या सुटकेला दिलं आव्हान

व्हिडिओ

ताज्या बातम्या
गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान
रब्बी हंगामात उच्चांकी पेरा; डिसेंबरअखेपर्यंत ६५ लाख हेक्टरवर लागवडीचा अंदाज
आरोग्य वार्ता : कर्करोगावरील उपचारात मुली मागे
ऊस गाळपाची गती मंदावली, शेतकरी चिंतेत; लातूर जिल्ह्यातील चित्र
“…तर आता यांच्या पोटात गोळा यायला लागला”, उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंवर टीकास्र