पीटीआय
पटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्र्श्ववभूमीवर राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते तेजस्वी यादव यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत तीन मोठ्या घोषणा केल्या. या घोषणांमध्ये जीविका दीदींना महिन्याला ३० हजार रुपयांचे वेतन आणि सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी देणार असल्याची घोषणा केली. तसेच याआधीच त्यांनी आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर २० महिन्यांत प्रत्येक कुटुंबाला सरकारी नोकरी, असेही आश्वासन दिले होते. त्याची पुन्हा घोषणा केली.
तेजस्वी यादव म्हणाले की, महिलांना १० हजार रुपये लाच म्हणून देण्यात आले आहेत. हे सरकार तेही परत घेणार आहे. तसेच संपूर्ण बिहार राज्य सध्याच्या सरकारवर संतापले असून भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीला कंटाळले आहे. या सरकारने आमच्या योजनांची नक्कल केली आहे. तेजस्वी यादव म्हणाले, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपली, आता निवडणूक प्रचाराची वेळ आली आहे. बिहारच्या लोकांनी बदल घडवण्याचा निर्धार केला आहे आणि ते डबल इंजिन सरकारला कंटाळले आहेत. कंत्राटींना कायम नोकरी, जीविका दीदींना ३० हजार बेरोजगारी आणि महागाईच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी अनेक घोषणा केल्या, परंतु सध्याच्या सरकारने त्यांच्या योजनांचीच नक्कल केली आहे.
‘महागठबंधन’चा कमकुवतपणा उघड
विधानसभा निवडणुकीदरम्यान विरोधकांच्या ‘महागठबंधन’ आघाडीत जागावाटपाचा तिढा अखेरपर्यंत न सुटल्याने भाजपने या आघाडीला लक्ष्य केले आहे. झारखंड मुक्ती मोर्चाने (झामुमो) महागठबंधनमधून माघार घेतल्यानंतर, या आघाडीचा कमकुवतपणा उघड झाला आहे, अशी टीका भाजपचे नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी मंगळवारी केली. राज्यातील काही जागांवर राजद आणि काँग्रेसचे उमेदवार एकमेकांविरोधात निवडणूक लढवत आहेत.
ही मैत्रीपूर्ण लढत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, महागठबंधनचा कमकुवतपणा उघड झाला आहे आणि ते अयशस्वी ठरले आहेत. या पक्षांनी निवडणुकीपूर्वीच हार मानली आहे. त्यांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आघाडीच्या हितापेक्षा वरचढ ठरल्या आहेत अशी काही मैत्रीपूर्ण लढत नाही अशी टीका बिहारचे मंत्री संतोष सुमन यांनी केली.
जीविका बहिणींसाठी व्याजमुक्त कर्ज
● यादव यांनी सांगितले की, जीविका बहिणींना दोन वर्षांसाठी व्याजमुक्त कर्ज मिळेल. त्यांना इतर सरकारी कामे करण्यासाठी मासिक २००० रुपये भत्ता देखील मिळेल. त्यांच्या निवडणूक आश्वासनांचा एक भाग म्हणून, त्यांनी बेटी (बेटी) योजना आणि माँ (माँ) योजनेंतर्गत महिलांसाठी घर, अन्न आणि उत्पन्न देण्याचे आश्वासन दिले. कंत्राटी कामगारांसाठी योजना आखण्याचे आश्वासन देताना, राजद नेत्याने सांगितले की, त्यांना नोकरीची सुरक्षा आणि वेतनाची सुरक्षा दिली जाईल.