एपी, हुआलीन

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तैवानमधील बुधवारच्या भूकंपानंतर अद्यापही बेपत्ता असलेल्या अनेक लोकांच्या शोधाची मोहीम दुसऱ्या दिवशी, गुरुवारीही सुरू होती. गेल्या २५ वर्षांतील या सर्वात शक्तिशाली भूकंपात दहा जण ठार असून, अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. दुर्गम भागांत अनेक लोक अद्यापही अडकून पडले आहेत.

 भूकंपाच्या केंद्रिबदूजवळ असलेल्या हुआलियन या किनाऱ्यावरील शहरात कामगारांनी एका नुकसानग्रस्त इमारतीच्या तळाला आधार देण्यासाठी उत्खनकाचा वापर केला. भूकंपात ४८ निवासी इमारतींचे नुकसान झाले असून, त्यापैकी काही इमारतींचे तळमजले चिरडले गेल्याने त्या कललेल्या आहेत, असे महापौर ह्सु चेन-वेई यांनी सांगितले.

हेही वाचा >>>“आम्ही खोटं-खोटं…”, पंतप्रधान मोदींकडे इशारा करत नितीश कुमारांनी युतीबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत; नेमकं काय म्हणाले?

 हुआलियनचे काही नागरिक तंबूंमध्ये राहात असून, या परगण्याला राजधानी तैपेईशी जोडणारा मुख्य रस्ता गुरुवार दुपापर्यंत बंद होता. मात्र तैवानचे सामान्य जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत होते. हुआलियनसाठी काही स्थानिक रेल्वे सेवा पुन्हा सुरू झाल्या, तसेच संगणक चिप तयार करणाऱ्या जगातील सर्वात महत्त्वाच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चुअिरग कंपनीने बहुतांश कामकाज पुन्हा सुरू केले, असे वृत्त दि सेंट्रल न्यूज एजन्सीने दिले.

 तैवानला भूकंपाचे धक्के नेहमीच बसत असतात आणि देशाचे नागरिक त्यासाठी सज्ज असतात. इमारती भूकंपरोधक असाव्यात यासाठी देशात बांधकामाचे कठोर निकष आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The search for people missing in the earthquake is still going on in taiwan amy