भूकंप ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. भूपृष्टाखाली खडकाचे वेगवेगळे थर आहेत. हे थर एकमेकांवर आदळत असतात. ज्यामुळे भूपृष्ठाखाली प्रचंड ताण निर्माण होत असतो. हा ताण मर्यादेपलीकडे गेल्यास यातून निर्माण होणाऱ्या उर्जेचे उत्सर्जन होते. उर्जा उत्सर्जनातून निर्माण झालेल्या लहरींमुळे कंपने निर्माण होतात. ज्याला भूकंप म्हटले जाते. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल या एककात मोजली जाते. भूकंपात मोठी जीवित तसेच वित्तहानी होण्याची शक्यता असते. भृपष्ठाखाली भूकंपाला जेथे सुरुवात होते त्याला हायपोसेंटर किंवा भूकंपाचे केंद्र म्हटले जाते. भूकंपामुळे भूपृष्ठावर जेथे सर्वप्रथम ही कंपने जाणवतात त्याला भूकंपाचे इपिसेटंर म्हणजेच भूकंपाचे अपिकेंद्र म्हणतात.Read More
नेपाळमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीपूर्वी ६.४ ‘रिश्टर स्केल’ तीव्रतेचा जोरदार भूकंपाचा धक्का बसला. नेपाळच्या पश्चिम भागातील दुर्गम डोंगराळ प्रदेशात हा भूकंप झाला.